Home /News /pune /

शेतकऱ्याकडून लाच घेणारा तलाठी अटकेत, पुणे जिल्ह्यातील घटना

शेतकऱ्याकडून लाच घेणारा तलाठी अटकेत, पुणे जिल्ह्यातील घटना

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असतांनाच रूपयाची किंमत 2 रुपयांनी वधारली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असतांनाच रूपयाची किंमत 2 रुपयांनी वधारली आहे.

पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडून नारायणगाव पोलिसात गुन्हाही दाखल केला आहे.

जुन्नर, 6 ऑक्टोबर : एकीकडे कोरोना संकट असताना तर दुसरीकडे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांपुढे अनेक संकट उभी राहिली आहेत. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी काम करण्यापेक्षा शेतकऱ्याकडून 1 एक हजारांची लाच घेताना एक लाचखोर तलाठी लाचलुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहात पकडला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील खोडद येथील सुनील प्रभाकर राणे (वय 52) असं या तलाठी भाऊसाहेबांचं नाव आहे. खोडद येथील तलाठी कार्यालयातच 1000 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी दुपारी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडून नारायणगाव पोलिसात गुन्हाही दाखल केला आहे. मांजरवाडी येथील एका शेतकरी तक्रारदार यांनी सहकारी बँकेकडून घेतलेल्या सात लाख रुपये शेती कर्जाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी 1 हजार रुपये लाचेची मागणी करून ते स्वीकारले असता त्यास रंगेहात पकडण्यात आहे. या कारवाईत लाचलूचपत सापळा पथकाच्या श्रीमती प्रतिभा शेंडगे, पोलीस उपअधीक्षक म.पो.शि. सुप्रिया कादबाने, पो.शि. किरण चिमटे. चालक पो.शि. अभिजित राऊत यांनी पुढाकार घेतल. राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र. श्री. संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.श्रीमती सुषमा चव्हाण .अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि पुणे हे या करवाईत मार्गदर्शन अधिकारी होते.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या