गणेशोत्सव..पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई; तलवारी, चॉपर जप्त

गणेशोत्सव..पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई; तलवारी, चॉपर जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई केली आहे.

  • Share this:

अंनिस शेख, (प्रतिनिधी)

तळेगाव, 5 सप्टेंबर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्या ताब्यातील तीन तलवारी, दोन चॉपर जप्त केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा भंग न होता हा सण शांततेत पार पडावा यासाठी शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांना पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडून सूचना देण्यात आल्या. त्यानुसार तळेगाव शहर पोलिसांनी अनुचित प्रकार रोखण्यासाठी शहरात वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या आहेत. त्यातच तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौकात एक सराईत गुन्हेगार तीन तलवार तसेच दोन चॉपर घेऊन येणार असल्याची खात्रीलायक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अनिल गुणवंत म्हस्के (वय-30) या आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या तीन तलवारी तसेच दोन चोपर जप्त करण्यात आले. तळेगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहे.

चुलत बहिणीवरच त्याने केले वार..

जमिनीच्या वादातून एका व्यक्तिने त्याच्या चुलत बहिणीवरच भर रस्त्यात वार केले. आरोपी पळून जात असताना त्याचा पाठलाग करणाऱ्या नागरिकांवर त्याने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. महर्षी नगरमध्ये ही घटना बुधवारी घडली. एका व्यक्तिने जीवाची पर्वा न आरोपीला पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केले. विनोद मधुकर सराफ (वय-44, गुजराथ कॉलनी, कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे.

पुण्यातील महर्षी नगरमध्ये एका व्यक्तिने जमिनीच्या वादातून चुलत बहिणीवर भर रस्त्यात वार केले. नंतर त्याने पळ काढला असता रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. परंतु त्याने आपल्याजवळील पिस्तूलने नागरिकांवरच गोळीबार केला. सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही. या दरम्यान, आलम शेख नावाचा तरुणाने जीवाची पर्वा न करता आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावले. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 03:50 PM IST

ताज्या बातम्या