पुणे, 4 फेब्रुवारी : बावधन परिसरात मुंबई-बंगलोर महामार्गावर एसटी बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही आग लागल्यामुळे महामार्गावर मोठी गर्दी झालेली होती. वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या.
एसटी बसच्या आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ही आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत बस पूर्ण जळून खाक झाली आहे. दुर्घटनाग्रस्त बसमध्ये 35 प्रवासी होते, अशी माहिती आहे. मात्र सुदैवाने हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.