लॉकडाऊनमुळे जगणं अवघड झालंय साहेब' 'सुया घे पोत घे'च्या गायकाने मांडली व्यथा

लॉकडाऊनमुळे जगणं अवघड झालंय साहेब' 'सुया घे पोत घे'च्या गायकाने मांडली व्यथा

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यातील हजारो लोक कलावंत बेरोजगार झाले आहेत. या लोककलावंतांनी कुटुंब चालवायचे कसे?

  • Share this:

पुणे, 12 मे:  'गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊन (Lockdown) सुरू झाल्यापासून लोक कलावंतांचं जगणं अवघड झालं आहे. त्यांना दोन वेळच्या अन्नाची देखील मारामार होऊ लागली आहे. त्यामुळे शासनाने आम्हा लोक कलावंताकडे लक्ष द्यावे, आणि आम्हाला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी लोक कलावंत प्रदीप कांबळे (Pradeep Kamble) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.

लोकगीतकर  प्रदीप कांबळे हे महाराष्ट्रला परिचित आहेत. 'सुया घे पोत घे' गाणं महाराष्ट्रने डोक्यावर घेतल अनेक लोकगीत त्यांची महाराष्ट्रला माहित आहे. दीड वर्ष काम नसल्याने उपासमार सुरू झाली आणि त्यात कोरोनाने घेरलं जगायचं कसं असा प्रश्न त्यांना पडला आहे.

प्रदीप कांबळे गेल्या 3 मेपासून कात्रज येथील एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून रुग्णालयाचे आतापर्यंतचे बिल दीड लाखाच्या आसपास झाले आहे. त्यामुळे हे भरण्यासाठी आम्ही पैसे आणायचे कुठून? बिल भरण्यासाठी साहेब आम्हाला आमची कमावलेली पुंजी विकून या हॉस्पिटलचे बिल भरावे लागणार आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यातील हजारो लोक कलावंत बेरोजगार झाले आहेत. या लोककलावंतांनी कुटुंब चालवायचे कसे? असा पोटतिडकीने प्रदीप कांबळे विचारत आहे.

Amazing! आता फोन चेक करणार तुमचं बॉडी टेंपरेचर, काय आहे या नव्या मोबाइलची किंमत?

तसंच, 'आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या यात्रा, जत्रा, लग्न समारंभ सगळे कोरोनाच्या काळात बंद झाले आहे. त्यामुळे लोक कलावंताला जगणे अवघड झाले आहे. यापेक्षा मेलेलं बरं, आम्हाला वाली कोण, सरकारी मदत कधीच लोककलावंतला मिळत नाही'  अशी व्यथाह प्रदीप कांबळे यांनी मांडली.

प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला मदत करावी, अशी मागणी प्रदीप कांबळे यांनी केली आहे.

Published by: sachin Salve
First published: May 12, 2021, 2:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या