पुणेकरांना दिलासा, हेल्मेट सक्तीवर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

पुणेकरांना दिलासा, हेल्मेट सक्तीवर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

दुचाकी चालवत असताना पुणे शहरात पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली हेल्मेटसक्ती स्थगित करण्यात आली आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

मुंबई, 18 जून : हेल्मेट सक्तीसंदर्भातील पोलिसांच्या कारवाईला शहरी भागात स्थगिती देण्यात आली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सुचना दिल्या आहेत. आमदार माधुरी मिसाळ यांनी पुण्यात हेल्मेट सक्ती थांबावी यासाठी अनेक प्रयत्न केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असंच म्हणावं लागलं.

दुचाकी चालवत असताना पुणे शहरात पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली हेल्मेटसक्ती स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना केल्या असून यानंतर आता शहरी भागात हेल्मेट नसल्यास होणाऱ्या कारवाईला स्थगिती मिळाली आहे.

यासंदर्भात शहरातील आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या आहेत. याबाबात अधिक माहिती देताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, 'पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरीता वाहन चालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत आणि दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. हेच लक्षात घेत मंगवारी आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि या प्रश्नाला वाचा फोडली.'

याबरोबरच विनाहेल्मेट वाहन चालकांवर पोलीस करत असलेली दंडात्मक कारवाई, परवाना ताब्यात घेणं आणि पोलिसांची अरेरावी याबाबत भूमिकादेखील मांडण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांना पुण्यात शहरी आणि नागरी भागात हेल्मेट सक्ती स्थगित करण्याबाबतची विनंती मान्य करीत पुणे पोलीस आयुक्तांना तात्काळ तशा सूचना दिल्या आहेत.

यामुळे शहरी भागात हेल्मेटच्या प्रश्नाबाबत पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात गेले सहा महिने सुरू असलेली हेल्मेटसक्ती थांबवण्याचे तोंडावरच आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तर निवडणूकीच्या तोंडावर नागरिकांमध्ये रोष नको म्हणून हा निर्णय घेतल्याचं आता बोललं जात आहे.

मात्र, हेल्मेटची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे असल्याने ही अंमलबजावणी करणं थांबवयाला सांगणं म्हणजे सर्वोच्च न्यायालायाचा अवमान ठरेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेत तोंडी आदेश दिले आहेत अशा चर्चा आता सुरू आहेत.


VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2019 04:29 PM IST

ताज्या बातम्या