मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे : महाराष्ट्रातील शेवटच्या टाडा खटल्यात भाई ठाकूर यांच्यासह तिघे निर्दोष

पुणे : महाराष्ट्रातील शेवटच्या टाडा खटल्यात भाई ठाकूर यांच्यासह तिघे निर्दोष

सुरेश दुबे खून प्रकरणी तिघे निर्दोष

सुरेश दुबे खून प्रकरणी तिघे निर्दोष

सुरेश दुबे खून प्रकरणी पुण्यातील टाडा न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हे देशातील शेवटचं टाडा प्रकरण असल्याचं म्हटलं जातं.

पुणे, 24 मे : विरारमधील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणी भाई ठाकूरसह इतर काही जणांविरुद्ध टाडा अँक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 34 वर्षांपूर्वी खून झाल्यानंतर 2005 मध्ये खटला सुरू झाला होता. या खटल्यात सरकारी पक्षाकडून 80 पेक्षा जास्त साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.

सुरेश दुबे खून प्रकरणी पुण्यातील टाडा न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हे देशातील शेवटचं टाडा प्रकरण असल्याचं म्हटलं जातं. या खटल्यात एकूण 102 साक्षीदार दपासण्यात आले. भाई ठाकूर यांच्यासह तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

भाई ठाकूर यांच्यासह इतरांवर आरोप होता की, सुरेश दुबे यांनी जागेचा ताबा सोडावा आणि हफ्ता द्यावा. अन्यथा त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारू अशी धमकी देण्यात आली होती. सुरेश दुबे यांना जागा रिकामी करण्यासाठी सतत दबाव टाकला जाऊ लागला. त्यामुळे अखेर सुरेश दुबे यांनी वकिलांतर्फे ठाकूर यांना नोटिसही पाठवली होती. त्यानंतर 9 ऑक्टोबर 1989 रोजी बिल्डर दुबे रेल्वे स्थानकावर पेपर वाचत असतानाच त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

कानशिलात लगावल्याचा राग अन् बापलेकाने रचला कट; तळेगावमधील घटनेला वेगळं वळण 

सुरेश दुबे खून प्रकरणी पोलिसांनी 17 जणांना अटक केली होती. काही पोलिसांनी आरोपींना साथ दिल्याबद्दल त्यांनाही यात आरोपी केलं होतं. मुख्य आरोपी सोडून पोलिसांनी इतरांना अटक केली असंही म्हटलं जात होतं.

1992 मध्ये फिर्यादी ओमप्रकाश दुबे यांनी रेल्वे पोलिस महासंचालकाकडे धाव घेत या प्रकरणी न्याय मिळावा असं म्हटलं होतं. तर पुणे टाडा न्यायालयाने 16 मे 1997 रोजी आरोपींना सोडून दिले. तेव्हा दुबे यांनी अपील केल्याने सुप्रीम कोर्टाने सहा जणांना जन्मठेप सुनावली तर फरार असलेल्यांविरुद्ध पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले. 2004 मध्ये या खून प्रकरणी आरोपपत्र दाखल केले. साक्षीदारांची तपासणी केल्यानंतर अडीच हजारांहून अधिक कागदपत्रे न्यायालयात सादर केली गेली होती.

First published:
top videos

    Tags: Pune