Home /News /pune /

झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांवर भडकल्या सुप्रिया सुळे

झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांवर भडकल्या सुप्रिया सुळे

पुण्यातील आंबिल ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेनं (Pune municipal corporation) कारवाई करत अनेक घरं जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईवरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त केला आहे.

    पुणे, 25 जून: मागील दोन दिवसांपासून पुण्यातील आंबिल ओढा (Ambil odha pune) अतिक्रमण प्रकरण महाराष्ट्राभर चांगलचं चर्चेत आहे. आंबिल ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेनं (Pune municipal corporation) कारवाई करत अनेक घरं जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईवरून राष्ट्रवादीच्या नेत्या (NCP Leader) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. पुण्याच्या महापौरांना कारभार झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पुण्यातील आंबिल ओढ्यावरील कारवाईबाबत चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. आंबिल ओढ्यावर कारवाई कोणी केली, हे सर्वांना माहित आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून त्यांनीच ही कारवाई केली आहे. या घटनेची चौकशी व्हावी. तसेच महापौरांनी याप्रकरणी उत्तर द्यावं. आणि हे सर्व झेपत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अनिल देशमुख यांच्यावर ED ने केलेल्या कारवाईबाबत भाष्य केलं आहे. "राजकारण हे विचारांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी यापूर्वी कधीही तपास यंत्रणांचा वापर केला नव्हता. पण देशात पहिल्यांदाच अशाप्रकारे यंत्रणांचा गैरवापर होताना आपण पाहात आहोत," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. हेही वाचा-आंबिल ओढ्याचा आक्रोश !, ''शत्रूच्या घरात रणगाडे घुसवावे तसे बुलडोझर घुसवले'' देशात कोरोनाचा बिकट परिस्थिती असताना सरकारकडून अशाप्रकारे सुडाचं राजकारण केलं जातं आहे. जे पूर्णपणे चुकीचं आहे. आमचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे. आम्ही लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहोत. कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर काय तयारी करता येईल, याबाबतची चर्चा आज केली जाणार आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी महाविकास आघाडी विविध नियोजन करत आहे, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Supriya sule

    पुढील बातम्या