मराठी बातम्या /बातम्या /पुणे /सुप्रिया सुळेंना आव्हान देणाऱ्या कांचन कुल यांच्यावर नवी जबाबदारी, पुण्यात मिळालं पद

सुप्रिया सुळेंना आव्हान देणाऱ्या कांचन कुल यांच्यावर नवी जबाबदारी, पुण्यात मिळालं पद

कांचन कुल या बारामती लोकसभेच्या भाजप उमेदवार होत्या पण त्यांचा पराभव झाला होता.े

कांचन कुल या बारामती लोकसभेच्या भाजप उमेदवार होत्या पण त्यांचा पराभव झाला होता.े

कांचन कुल या बारामती लोकसभेच्या भाजप उमेदवार होत्या पण त्यांचा पराभव झाला होता.े

सुमित सोनवणे,प्रतिनिधी

दौंड, 17 ऑगस्ट : सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत आव्हान देणाऱ्या कांचन कुल यांच्यावर आता नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांची पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. कांचन कुल या बारामती लोकसभेच्या भाजप उमेदवार होत्या पण त्यांचा पराभव झाला होता.

दरम्यान, गेल्या वर्षीच भाजपवासी झालेले विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना पश्चिम महाराष्ट्राचे भाजपचे प्रवक्ते करण्यात आलं आहे. तसंच गेल्याच वर्षी भाजपवासी झालेले धनंजय महाडिक यांच्यावरही पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांची पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे. मकांचन कुल यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातुन लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. त्यामुळे ती निवडणूक लक्षवेधी ठरली होती.

कांचन कुल यांचा त्या निवडणूकित पराभव झाला. असला तरी त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली असल्याने भाजपने त्यांना पुणे जिल्हा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षपद देऊन सक्रिय राजकारणात आणले असच म्हणावे लागले. कांचन कुल यांचे पती आमदार राहुल कुल हे पुणे जिल्हातील भाजपचे एकमेव आमदार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात.

....आणि रागाच्या भरात उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीनेच घेतला दुकानदाराचा चावा!

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीचं शेवटच्या क्षणी तिकीट मिळवणारे राहुल नार्वेकर यांनाही प्रवक्तेपद देण्यात आलं आहे. भारती पवारही गेल्याच वर्षी लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपमध्ये आल्या होत्या. त्या नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांच्याकडेही भाजपकडून जबाबदारी सोपवली आहे.

पुणेकरांना मोठा दिलासा, अवघ्या 24 तासांत थेट मोबाईलवर पाहता येणार कोरोना रिपोर्ट

सुप्रिया सुळे vs कांचन कुल

लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे जवळपास दीड लाख मतांची आघाडी घेत भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला होता. सुप्रिया सुळेंच्या या विजयाने बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं होतं. या मतदारसंघातून भाजपच्या कांचन कुल यांनी त्यांना आव्हान दिलं होतं. सुरुवातीचे कल हाती आले तेव्हा कांचन कुल यांनी आघाडी घेतली होती. मात्र, नंतर त्या मोठ्या प्रमाणात पिछाडीवर पडल्या आणि त्यांचा पराभव झाला.

First published:

Tags: Supriya sule