दगाबाजीचे, धोकेबाजीचे पुरावे द्या, सुप्रिया सुळेंचं हर्षवर्धन पाटलांना थेट आव्हान

दगाबाजीचे, धोकेबाजीचे पुरावे द्या, सुप्रिया सुळेंचं हर्षवर्धन पाटलांना थेट आव्हान

'बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मग ते शरद पवार असो वा सुप्रिया यांचे प्रामाणिकपणे काम केले, आघाडी धर्म पाळला. बदल्यात मात्र आपल्यावर अन्याय झाला, अपमान वाट्याला आला.'

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे 5 सप्टेंबर : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी इंदापूरमध्ये मेळावा घेऊन राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादी धोकेबाज, दगाबाज, विश्वासघातकी आहे असा घणाघाती आरोप करत पवार कुटुंबीयांवर त्यांनी सगळा राग काढला होता. हा राग काढत असतानाच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचेही संकेत दिले होते. हर्षवर्धन पाटील यांचे हे आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलेच लागले आहेत. आज पुण्यात त्यांनी पाटील यांना या दगाबाजीचे पुरावे सादर करण्याचं थेट आव्हानच दिलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील आणि आमच्यात कौटुंबीक संबंध आहेत. त्यांचे कालचं भाषण ऐकल्यानंतर दुःख झालं. त्यानंतर मी त्यांना अनेकवेळा फोन केला पण त्यांचा फोन लागला नाही. दगाबाजीच्या आरोपाचे त्यांनी पुरावे दिले पाहिजेत. जे पक्ष सोडून जाताहेत ते मुलांच्या भवितव्यासाठी विचारांची फरफट करताहेत. मला कौतुक वाटतय की पवारांना फक्त मुलगीच आहे. आता फक्त मुलांचा प्रवेश होतो वडिलांना नकार मिळतो असंही त्या म्हणाल्यात.

कोल्हापूर दक्षिणच्या 'आखाड्या'त रंगणार पाटील विरुद्ध महाडीक असा सामना!

छगन भुजबळ यांच्या शिवसेने प्रवेशाच्या चर्चेवरही त्यांनी मत व्यक्त केलं.  भुजबळांवर माझा विश्वास, कुणी काहीही म्हणेल, ते काही म्हणत नाहीत तोवर मी कशावरही विश्वास ठेवणार नाही. पवारांवर टीका केल्याशिवाय महाराष्ट्रात कुणीही मोठ होऊ शकत नाही हा 50 वर्षांचा इतिहास आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

काय म्हणाले होते हर्षवर्धन पाटील?

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरातल्या मेळाव्यात एकदाचे आपल्या मनात वर्षानुवर्षे साचलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. यांनी त्यांचा भाजपकडे जायचा कल आहे हे सूचकपणे सांगितले आणि जनसंकल्प मेळाव्याला उपस्थित इंदापूरकरांनीही भाजप, भाजप, कमळ, कमळ म्हणत तोच कौल दिला.

अर्थात 10 सप्टेंबरच्या आसपास आपण काँग्रेस सोडून कुठं जाणार याचा अंतिम निर्णय घेऊ म्हणत त्यांनी थोडी संदिग्धता ठेवलीय.

नांदेडमध्ये 9 जगांसाठी 100 अर्ज; पण नोकरीसाठी नाही तर...

आपले चुलते बाजीराव पाटील यांना लोकसभेचे तिकीट नाकारून अजित पवारांना दिले. तेव्हापासून आपण प्रामाणिकपणे बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मग ते शरद पवार असो वा सुप्रिया यांचे प्रामाणिकपणे काम केले, आघाडी धर्म पाळला. बदल्यात मात्र आपल्यावर अन्याय झाला, अपमान वाट्याला आला, राजकीय कोंडी केली गेली आणि राष्ट्रवादीने सगळा विचका केला म्हणत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे या तिघांवर दगाबाजी, विश्वासघात केल्याचे आरोप केले.

'या' अधिकाऱ्याच्या हाती असेल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी

कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा विरोध असतानाही आपण  सुप्रिया सुळेंना इंदापुरातून 72 हजार मतांचे लीड मिळवून दिले मात्र शिवस्वराज्य यात्रा मुद्दाम इंदापुरात काढून, दत्तात्रय भरणे या विद्यमान आमदारालाच तिकीट दिलं जाईल असे संकेत देत जखमेवर मीठ चोळले गेले अशी  व्यथा त्यांनी मांडली होती.

First published: September 5, 2019, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading