मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे : 7 जणांच्या हत्याकांडातील आरोपी निर्दोष, 28 वर्षे तुरुंगवासानंतर न्यायालयाने ठरवले अल्पवयीन

पुणे : 7 जणांच्या हत्याकांडातील आरोपी निर्दोष, 28 वर्षे तुरुंगवासानंतर न्यायालयाने ठरवले अल्पवयीन

पुण्याला हादरवणाऱ्या राठी हत्याकांडात १९९४ मध्ये ७ जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी तेव्हा अल्पवयीन असल्याचं सांगत २८ वर्षांच्या तुरुंगवासानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

पुणे, 29 मार्च : पुण्यात ३० वर्षांपूर्वीच्या केसरीमल राठी खून प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची अल्पवयीन असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने तब्बल २८ वर्षांनी निर्दोष सुटका केलीय. निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपीचे नाव नारायण चेतनराम चौधरी असं आहे. ज्यावेळी गुन्हा घडला तेव्हा आरोपीचे वय १२ वर्षे होते असं न्यायालयाने म्हटलयं.

कोथरूचमध्ये सागर स्वीट्स नावाचं केसरीमल यांचं दुकान होतं. या दुकानात काम करणाऱ्या राजपुरोहित व जितेंद्र नैनसिंग गेहलोत यांनी नारायणच्या मदतीने केसरीमल यांचं अपहरण करून खंडणीचं कारस्थान रचलं होतं. त्यानंतर २६ ऑगस्ट १९९४ रोजी राठी कुटुंबातल्या ७ जणांची हत्या करण्यात आली होती.

दर्शन सोळंकी प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, IIT बॉम्बेमध्ये प्रश्नपत्रिकेवर सुसाइड नोट

न्यायालयाने या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयासह इतर न्यायालयांनी गुन्हा घडला तेव्हा नारायण चौधरीचे वय २० ते २२ वर्षे असं नोंद केलं होतं. यावर नारायण चौधरीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करत तेव्हा आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये पुण्याच्या जिल्हा न्यायाधीशांना चौधरीच्या वयाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानतंर अहवालात गुन्ह्याच्या वेळी नारायण चौधरीचे वय १२ वर्षे होते असं समोर आलं. तसंच राजस्थानमधील शाळेत असलेल्या नोंदीही सापडल्या.

दरम्यान, सुनावणीवेळी नारायण त्याचं वय सिद्ध करू शखला नव्हता कारण महाराष्ट्रात तो दीड वर्षेच शाळेत गेला होता. अखेर २८ वर्षांच्या तुरुंगवासानंतर खंडपीठाने नारायण याचा अल्पवयीन असल्याचा दावा खरा असल्याचं सांगत त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.

१९९४ मध्ये राठी हत्याकांडाने पुणे हादरले होते. एकाच घरातील दोन मुले आणि एका गर्भवतीसह सात जणांची हत्या करण्यात आली होती. यात चार महिलांचा समावेशही होता. हत्येनंतर आरोपींना मौल्यवान वस्तू घेऊन राजस्थानमध्ये पळ काढला होता.

First published:
top videos

    Tags: Pune