सुप्रीम कोर्टाचा 'सहारा'ला दणका; अॅम्बी व्हॅलीचा लिलाव कराण्याचे दिले आदेश

Samruddha Bhambure | Updated On: Apr 17, 2017 06:59 PM IST

सुप्रीम कोर्टाचा 'सहारा'ला दणका; अॅम्बी व्हॅलीचा लिलाव कराण्याचे दिले आदेश

 

17 एप्रिल :  सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा 'सहारा' समूहाला जोरदार दणका दिला आहे. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये परत करण्यासाठी पुण्याजवळच्या अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करा, असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास सहारा समूह अपयशी ठरल्याचा हवाला देत न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सहारा समूहाचे प्रमूख सुब्रतो राय यांना पुढील सुनावणीवेळी वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 28 एप्रिल रोजी होणार आहे.

13 एप्रिल पर्यंत 5 हजार 92 कोटी जमा करा, असे आदेश सुप्रीम कोर्टानं सहारा समूहाला दिले होते. पण सहारानं तसं केलं नाही. त्यामुळे अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करून दंडाचे पैसे वसूल करा, असे आदेश आता कोर्टाला द्यावे लागलेत.

गुंतवणूकदारांना फसवल्याच्या आरोपाखाली सहाराचे अध्यक्ष सुब्रतो रॉय जेलमध्ये आहे. एकूण 19 हजार कोटी सहाराला गुंतवणूकदारांना परत करायचे आहेत. 11 हजार कोटी भरले आहेत, असा दावा सहारानं केलाय. आम्ही सर्व पैसे 2019च्या जुलैपर्यंत परत करतो, हा सहाराचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टानं फेटाळला आहे.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सहारा चिटफंड प्रकरणाची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने अॅम्बी व्हॅली जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर सहारा समूहाकडे ज्या संपत्तीवर कर्ज नाही अशा संपत्तीची यादी मागितली होती. दरम्यान, सहारा समूहाने चांगला प्रस्ताव दिल्यास हा लिलाव टाळता येईल, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 06:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close