Home /News /pune /

संजय राऊतांकडून पुन्हा सेना-भाजप युतीचे संकेत, ‘हसत-खेळत’ दिला राष्ट्रवादीला इशारा

संजय राऊतांकडून पुन्हा सेना-भाजप युतीचे संकेत, ‘हसत-खेळत’ दिला राष्ट्रवादीला इशारा

आमचं ऐका, अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच (Sunjay Raut signals Sena BJP Alliance once again) आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचे संकेत दिले.

    पुणे, 26 सप्टेंबर : महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी (Sunjay Raut signals Sena BJP Alliance once again) करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र गेल्या काही दिवसांत दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ताज्या वक्तव्यातून याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. पुणे जिल्ह्यात आमचं कुणी ऐकत नाहीत, असं म्हणतात. आम्ही अजित पवारांना (Sanjay Raut on Ajit Pawar) आमचं  ऐकायला सांगू, अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच  (Raut says CM is in Delhi) आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचे संकेत दिले. काय म्हणाले राऊत? पुणे जिल्ह्यातील भोसरीत घेतलेल्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. पुण्यात आपलं कुणी ऐकत नसेल, तर आपण अजित पवारांना सांगू. अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीत गेलेच आहेत, असं म्हणत त्यांनी सभागृहात एकच हशा पिकवला. मात्र त्यानंतर लगेच सारवासारव करत आपल्या म्हणण्याचा पूर्ण अर्थ समजून न घेता लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू करू नका, असं वक्तव्य माध्यमांना उद्देशून केलं. हसतखेळत इशारा माझं म्हणणं चुकीचं ऐकू नका, असं राऊतांनी म्हटल्यावर सभागृहात हशा पिकला. मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, कारण एक दिवस आपल्याला दिल्ली काबीज करायची आहे. महाविकास आघाडी दिल्लीवर राज्य करणार असल्यामुळे पंतप्रधान कुठे बसतात, ते पाहण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याचं राऊत म्हणाले. महापौर आपलाच अनेक दिवसांपासून भोसरीत मेळावा घेण्याचा विचार होता, असं म्हणतानाच पुढील महापौर आपलाच असेल, अशी घोषणा त्यांनी केली. स्टेजवर बसलेल्या प्रत्येकाने 3 नगरसेवक निवडून आणले तरी महापालिकेत आपली सत्ता येईल, असं सांगत शिवसेनेच्या मनगटात ताकद होती, म्हणूनच महाराष्ट्रात आपली सत्ता असल्याचं ते म्हणाले. हे वाचा- वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकला सून हवीय; अटी वाचून मुली म्हणाल्या... स्वबळाचा इशारा गेल्या वेळी 4 प्रभाग असल्यामुळे आपल्याला फटका बसला, जो इतरांना बसला नाही. याचाच अर्थ आपलं संघटन कमी पडल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी प्रत्येकाने स्वबळावर लढण्याची ताकद ठेवायला हवी, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे स्वबळाचा इशाराच दिला.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Ajit pawar, Pune (City/Town/Village), Sanjay Raut (Politician), Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या