साखरेनं भरललेल्या ट्रकचे ब्रेक झाले निकामी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातात 1 ठार

साखरेनं भरललेल्या ट्रकचे ब्रेक झाले निकामी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातात 1 ठार

आज सकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळ्याजवळ हा अपघात घडला आहे. कर्नाटकहून मुंबईकडे साखरेचे पोते घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाले.

  • Share this:

आनिस शेख, प्रतिनिधी

पुणे, 10 ऑक्टोबर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलाजवळ साखरेनं भरलेला ट्रक ब्रेक निकामी झाल्यामुळे उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण किरकोळ जखमी आहे.

आज सकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळ्याजवळ हा अपघात घडला आहे.  कर्नाटकहून मुंबईकडे साखरेचे पोते घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाले. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे भरधाव वेगात ट्रक पुढे जात होता. त्यामुळे चालकाने ट्रकवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न केला पण असता यश आले नाही.  भरधाव ट्रक खंडाळा येथील अवघड वळणावर असलेल्या अमृतांजन पुलाजवळ पोहोचला. तेव्हा वळणावर महामार्गाच्या बाजूला उलटला.

ट्रक जसा उलटला तेव्हा काही जणांनी ट्रकमधून बाहेर फेकले गेले. ट्रकमध्ये असलेल्या साखरेच्या पोत्याखाली अडकल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.

विचित्र अपघाताचा LIVE VIDEO, झाड आणि कारचं दार यामध्ये चिरडली महिला

ट्रक रस्त्याच्या एका बाजूला पलटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, लोकमान्य हॉस्पिटल यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमी तसंच ट्रकखाली अडकलेल्या मयत व्यक्तीस बाहेर काढून दोघांनाही रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Published by: sachin Salve
First published: October 10, 2020, 10:01 AM IST
Tags: mumbaipune

ताज्या बातम्या