मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; महापौरांनी केली मोठी घोषणा

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; महापौरांनी केली मोठी घोषणा

MPSC Exam Latest Update: पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची (competitive exams) तयारी  करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol Announcement) यांनी मोठी घोषणा केली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 12 मार्च: राज्यसेवा परीक्षेची (MPSC) तारीख पुढे ढकलल्याने स्पर्धा परीक्षेची (Competitive Exams) तयारी करणारे राज्यातील बहुसंख्य विद्यार्थी रस्त्यावर (Student Protest) उतरले आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टपणे नाराजी उमटली आहे. असं असताना पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol Announcement) यांनी मोठी घोषणा केली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसला (Coaching Classes) परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जरी वाढत असला, तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. परीक्षांच्या तारखा सातत्याने पुढे ढकलल्या जात आहेत. सोबतच परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक असणारे कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे MPSC- UPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप होतं आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोचिंग क्लासेसला परवानगी देण्यात आली आहे.

यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्विटमध्ये माहिती दिली की, 'स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसला परवानगी देण्यात आली  आहे. याबाबतची सूचना आपण पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. आजच्या बैठकीत संबंधित सूचना मान्य करण्यात आली. कोरोना विषाणूसंबंधित सर्व नियम पाळून 50 टक्के आसन क्षमतेस परवानगी देण्यात आली आहे.' मोहोळ यांच्या या ट्विटनंतर विद्यार्थांमध्ये खुशीचं वातावरण आहे. अनेकांनी या निर्णयाचं कौतुकं केलं आहे.

(वाचा -COVID-19: पुण्यात 31 मार्चपर्यंत शाळा राहणार बंद, आज रात्रीपासून कडक निर्बंध)

MPSC पूर्व परीक्षा 21 मार्चला होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची (MPSC exam) नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी 14 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज याची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. कोरोना साथीमुळे MPSC ची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

First published:

Tags: Education, Exam, Mpsc examination, Pune news