आय एम गोईंग टू सुसाईड.. पुण्यात अॅडमिशन न मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

पुण्यातील शाहू महाविद्यालयात अॅडमिशन मिळाले नाही म्हणून नैराश्‍य आलेल्या एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 04:00 PM IST

आय एम गोईंग टू सुसाईड.. पुण्यात अॅडमिशन न मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे, 22 ऑगस्ट- पुण्यातील शाहू महाविद्यालयात अॅडमिशन मिळाले नाही म्हणून नैराश्‍य आलेल्या एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश सदाफुले (18) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाशच्या मृत्यूस महाविद्यालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतापलेल्या पालकांनी मुलाचा मृतदेह थेट प्राचार्यांच्या दालनबाहेर ठेवला. अखेर दत्तवाडी पोलिसांनी मध्यस्थी करुन मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची विनंती पालकांना केली.

'आय एम गोईंग टू सुसाईड'

आकाशला शाहू महाविद्यालयात 11 वी सायन्सला अॅडमिशन घ्यायचे होते. आकाशने मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्याने मित्राला 'आय एम गोईंग टू सुसाईड' असा मेसेज पाठवला होता. अॅडमिशन न मिळाल्याने आकाश खचला होता. त्याने नैराश्‍यातून आलेल्या त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संतापलेल्या पालकांनी सकाळी त्याचा मृतदेह घेऊन थेट महाविद्यालय गाठले. हे पाहून तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला. दोषींना अटक करा, अशी पालकांनी मागणी केली आहे. दत्तवाडी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पालकांनी आकाशचा मृतदेह पुन्हा ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणाची गुन्हा दाखल झाल्यावर चौकशी करण्यात येईल, अशी माहिती दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिली आहे.

VIDEO : 'राज ठाकरेंच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर आम्ही...', मनसे नेत्याचा थेट इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2019 04:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...