पुण्यात मध्याह्न भोजनातून विषबाधा, जेवण करताच मुलांना झाल्या उलट्या

पुण्यात मध्याह्न भोजनातून विषबाधा, जेवण करताच मुलांना झाल्या उलट्या

शालेय पोषण आहारातील जेवण केल्यामुळे कात्रज येथील स्व. रामभाऊ म्हाळगी विद्यायलायात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, (प्रतिनिधी)

पुणे, 21 ऑगस्ट- शालेय पोषण आहारातील जेवण केल्यामुळे कात्रज येथील स्व. रामभाऊ म्हाळगी विद्यायलायात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी ही घटना समोर आली. मध्याह्न भोजन केल्यामुळे उलट्या होऊ लागल्याने 20 विद्यार्थ्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी की, मध्याह्न पोषण आहारातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. शिक्षकांनी तातडीने मुलांना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विषबाधा झालेल्या मुलांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. तसेच ते कोणत्या इयत्तेत शिकत होती, हे देखील समजू शकले नाही.

मध्याह्न भोजन योजना 1995 मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली. शाळेतील मुलांची गळती कमी करणे, उपस्थिती वाढवणे आणि शाळेतील नव्या भरतीमध्ये वाढ करणे या उद्दिष्टाने ही योजना सुरू झाली. सुरुवातीला या योजनेअंतर्गत 8 वी पर्यंतच्या मुलांना धान्य/डाळी दिल्या जात होत्या. मात्र , 2002 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, धान्याऐवजी शिजवलेले अन्न मुलांना देणे सक्तीचे करण्यात आले.

भिवंडीत उर्दू हायस्कूलच्या पाचव्या मजल्यावरुन 10 वीच्या विद्यार्थिनाने मारली उडी

भिवंडी शहरातील अन्सारी साफिया गर्ल्स उर्दू हायस्कूलच्या पाचव्या मजल्यावरुन 10 वीच्या विद्यार्थिनाने उडी मारली. मोबशिराबानो नुरुद्दीन शेख असे मुलीचे नाव आहे. तिला जखमी अवस्थेत जे.जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. सध्या मोबशिराबानो नुरुद्दीन शेख हिची घटक चाचणी परीक्षा सुरू आहे. परीक्षा झाल्यानंतर मोबशिराबानो हिने हायस्कूलच्या पाचव्या उडी मारली. अभ्यासाच्या तणावामुळे मोबशिराबानो हिने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

VIDEO: वाऱ्याच्या वेगानं आला आणि सोनसाखळी हिसकावून फरार झाला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2019 03:11 PM IST

ताज्या बातम्या