Home /News /pune /

पुण्यात कडक लॉकडाउन, पहिल्या दिवसाची आली धक्कादायक आकडेवारी समोर

पुण्यात कडक लॉकडाउन, पहिल्या दिवसाची आली धक्कादायक आकडेवारी समोर

या कालावधीतील पहिला दिवस शिस्तबद्ध गेला असला तरी पुणे आणि परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी समोर आली.

    पुणे, 15 जुलै : पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पुणे शहरात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पण, लॉकडाउन केल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 1141 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात 10 दिवसांच्या लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या कालावधीतील पहिला दिवस शिस्तबद्ध गेला असला तरी पुणे आणि परिसरात याच दिवशी 1141 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भरधाव महिंद्रा कार डिव्हायडर तोडून बसवर आदळली, भीषण अपघातात 2 ठार 1141 पैकी पुण्यात 690 तर पिंपरी चिंचवडमध्ये 521 रुग्ण आढळले आहेत. तर  ग्रामीण भागात 171 तर छावणी परिसरात 109 रुग्णांची नोंद झाली आहे.  याचबरोबर 728 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आतापर्यंत एकूण 18824 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, पुण्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाउनमुळे पहिले पाच दिवस फक्त दूध घरपोचसेवा आणि मेडिकल्स वगळता सर्व सेवा बंद राहतील. 19 जुलैपासून भाजीपाला आणि दुकाने सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू राहणार आहेत. पुणे मनपाचे नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये काय बंद राहणार? - किरणा दुकाने, भाजी विक्री, मटन, अंडी, चिकन, मासे (14 ते 18 जुलै) - ऑनलाईन खाद्यपदार्थ, वस्तूंची डिलिव्हरी - मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, बाग, क्रीडांगणे आदी - हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल - सलून, ब्यूटी पार्लर - शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था - दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहतूक बंद (फक्त पासधारकांनाच परवानगी) - बांधकामे (ज्या ठिकाणी कामगारांच्या निवासीच व्यवस्था आहे, तेथे काम सुरू ठेवता येणार) - मंगल कार्यालये, लग्न समारंभ आदी -सर्व खासगी कार्यालये दुहेरी हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला! चिमुकल्यासमोर आई-वडिलांची निर्घृण हत्या काय सुरू राहणार ? - पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहणार (फक्त पासधारकांनाच इंधन, गॅस मिळणार) - दूध आणि वृत्तपत्रांचे घरपोच वितरण - सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, ऑनलाईन औषध सेवा - मेडिकल दुकाने, औषधांची घरपोच डिलिव्हरी - गॅस वितरण - बॅंका (ग्राहकांना बँकेत जाता येणार नाही), एटीएम - माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचाऱ्यांसह पुण्यात कोणाला घराबाहेर पडता येणार? - डॉक्‍टर, नर्स, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, अंगणवाडी सेविका, मेडिकल दुकानचे कर्मचारी, बी- बियाने विक्री करणारे, महावितरण, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा, शहरातून जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये जाणारे कामगार (पोलिस पाससह), जीवनावश्‍यक वस्तू, पार्सल, डबे पुरविणारे (पोलीस पाससह).
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या