Home /News /pune /

मोठी बातमी, पुण्यात आज लसीकरण बंद, साठा संपला!

मोठी बातमी, पुण्यात आज लसीकरण बंद, साठा संपला!

राज्य सरकारकडून लशीचा साठा पुरवण्यात आला होता. पण त्याचा साठाही आता संपला आहे.

पुणे, 28 एप्रिल : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर (Corona vaccination ) भर दिला जात आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस  दिली जाणार आहे.  पण, पुण्यात (Pune) आज लसीकरणच होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. लशीचा साठा नसल्यामुळे पुण्यातील सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मिनी लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर राज्य सरकारने भर दिला आहे. पण आता पुण्यातच लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पुण्यातील 150 लसीकरण केंद्र आज बंद राहणार आहे. लसीकरणाचा पहिला डोस घेण्यासाठी आलेल्या लोकांना आज साठा नसल्यामुळे लस मिळणार नाही. ज्या लोकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार होता, त्यांच्यासाठीच लसीकरण सुरू आहे. त्यामुळे नव्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावरून माघारी परतावे लागणार आहे. टॉयलेटमध्ये मिळाली होती सर्वात मोठी भूमिका; पाहा शर्मन जोशीचा भन्नाट किस्सा राज्य सरकारकडून लशीचा साठा पुरवण्यात आला होता. पण त्याचा साठाही आता संपला आहे. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईत सुद्धा लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मुंबईतील बिकेसी केंद्रावरील लशीचा साठा संपला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यांना मेसेज करून न येण्याची माहिती दिली जात आहे. लसीकरण मोहिमेसाठी वेगळी समिती! दरम्यान, राज्सात लसीकरण मोहिम लवकर आणि नियोजित व्हावी यासाठी खास वेगळे विभाग करावे का या संदर्भात आज मंत्रिमंडळात होणार चर्चा असल्याची माहिती मिळत आहे.  लस खरेदीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग अंतर्गत समिती गठीत केली आहे. धमाकेदार ऑफर्स! 20 रुपयांहूनही कमी किमतीत मिळतोय 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग त्यानुसारच लसीकरण राज्सात योग्य वेळेत व्हावे, यासाठी वेगळे खास विभाग सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर हा विभाग काम करणार आहे.  राज्यात साधरण ५ कोटी ७१ लाख नागरिक १८ ते ४५ वयोगटात आहे. राज्य शासन या वयोगटातील लोकांना साधरण जास्तीत जास्त 6 महिन्यात संपूर्ण लसीकरण करण्साचा विचारत असल्याचे समजते, या समन्वय यासाठी खास वेगळे खाते असते त्याच धर्तीवर विभाग करून त्यास अधिकार द्यावा का यावर आज कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Corona vaccination

पुढील बातम्या