पिंपरीत सावत्र आई-वडिलांचं अमानुष कृत्य, चिमुकल्यांना दिले सळईने चटके

पिंपरीत सावत्र आई-वडिलांचं अमानुष कृत्य, चिमुकल्यांना दिले सळईने चटके

सावत्र आई- वडिलांनी दोन चिमुकल्यांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड, 13 डिसेंबर : सावत्र आई-वडिलांनी दोन चिमुकल्यांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. या चिमुकल्यांना केलेली मारहाण इतकी अमानवीय होती की त्यांचे फोटो पाहिल्यानंतर अंगावर काटे येतात आणि संताप उठतो.

केवळ घरातील काम स्वच्छ करत नाहीत म्हणून या सावत्र आई-वडिलांनी या मुलांचा असा छळ केला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णायलयात उपचार सुरू आहेत.

धक्कादायक म्हणजे मारहाण करताना या मुलांना लोखंडी सळईने चटकेही दिल्या गेले. हा सगळा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ आरोपी आई मनीषा आणि वडिल गुंडेराव सुर्यवंशीला ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या या दोन्ही मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहीती मिळती रुग्णालयाकूडन देण्यात आली आहे. या अमानवी प्रकारामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड हादरून गेलं आहे.

Loading...

भोसरी परिसरात घडलेल्या या घटनेतील पीडित मुलं आपल्या मूळ गावी जायला निघाली असता, त्यांना काहीतरी त्रास होत असल्याचं एका नागरिकाच्या लक्षात आलं. तेव्हा त्या नागरिकाने ती बाब पोलिसांना सांगितली  आणि पोलिसांनी पीडित चिमुकल्यांना विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला.


LIVE VIDEO : पुतण्याने झाडल्या गोळ्या; काकाला पाठवलं यमसदनी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2018 10:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...