पुणे, 13 जुलै: काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) भारती विद्यापीठ कॅम्पसमध्ये (Bharati Vidyapith Campus) राहणाऱ्या 32 वर्षीय महिला डॉक्टरच्या (Female doctor) बाथरुममध्ये आणि बेडरुममध्ये छुपे कॅमेरे (Spy cameras in bedroom and washroom) लावल्याची घटना समोर आली होती. ही घटना समोर येताच संबंधित महिला डॉक्टरनं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात तपास करत स्पाय कॅमेरे लावणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या (Senior doctor arrest) आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पुण्यातील एका प्रसिद्ध डॉक्टरला अटक केली आहे. पोलिसांनी संबंधित डॉक्टरचं पितळ उघडं पाडून त्याला गजाआड केलं आहे. संबंधित आरोपी डॉक्टर पुण्यातील विविध मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन शिकवण्याचं काम देखील करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, संबंधित डॉक्टरचं कारस्थान उघड झालं आहे.
हेही वाचा-3 जणांची हत्या केल्यानंतर तरुणाची आत्महत्या; 2 दिवसात भावाचीही सापडली सुसाइड नोट
एकतर्फी प्रेमातून त्यानं हा उद्योग केल्याचंही सूत्रांनी सांगितलंय आहे. आरोपी डॉक्टर हा एम डी असून न्युरोलोजी स्पेशालिस्ट आहे. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात त्याचं स्वत:चं क्लिनिक देखील आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या 32 वर्षीय महिला डॉक्टरनं 8 जुलै रोजी यासंदर्भात तक्रार दिली होती. तिच्या वॉशरूममध्ये आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याचं तिच्या निदर्शनास आलं होतं.
हेही वाचा-मित्राला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला; हायप्रोफाईल सेक्स रॅकेटच्या एजंटला अटक
तक्रारदार महिला डॉक्टर भारती विद्यापीठ कॅम्पस परिसरात असणाऱ्या डॉक्टर्स कॉर्टरमध्ये राहतात. 6 जुलै रोजी त्या सकाळी 8:80 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. यावेळी त्यांना घरातील वातावरण संशयास्पद वाटलं. त्यांनी घरातील कानाकोपऱ्याची पाहणी केली असता त्यांना लाल लाईट चमकत असल्याचं आढळलं. अधिक बारकाईनं पाहणी केली असता त्यांना बाथरूममध्ये आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याचं निदर्शनास आलं. यानंतर त्यांनी 8 जुलै रोजी भारती विद्यापीठ पोलीसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune