मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भरधाव कारने चिमुकल्याला चिरडले, पिंपरी-चिंचवडमधील भीषण अपघात CCTV मध्ये कैद

भरधाव कारने चिमुकल्याला चिरडले, पिंपरी-चिंचवडमधील भीषण अपघात CCTV मध्ये कैद

पिंपरीत भरधाव कारने चिमुकल्याला चिरडले, अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO आला समोर

पिंपरीत भरधाव कारने चिमुकल्याला चिरडले, अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO आला समोर

Speeding car crush 9 year old in Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागात एका महिलेने बेदरकारपणे गाडी चालवत 9 वर्षाच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडलीय.

पिंपरी चिंचवड, 9 ऑक्टोबर : भरधाव कारने एका 9 वर्षाच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना (Speeding car crushed 9 year old child) समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) भागात ही घटना घडली आहे. एका महिलेने बेदरकारपणे गाडी चालवत 9 वर्षांच्या मुलाला चिरडले. ही संपूर्ण घटना सोसायटी परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (shocking incident caught in cctv) झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या घटनेत इनॉष प्रदीप कसब नावाच्या मुलाच्या छाती, पोट, तोंड, खांद्यावरून कार गेल्याने तो गंभीररित्या जखमी झाला आहे. या चिमुकल्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागरच्या साई वास्तू हाउसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. इनॉष आपल्या मित्रांसोबत सोसायटी परिसरात खेळत होता. त्यावेळी सोसायटीतील रहिवासी असलेली सोनल देशपांडे नामक ही रॅश ड्रायव्हिंग करत कार चालवत जात होती. त्यावेळी इनॉष प्रदीप कसब याला तिच्या कारची धडक बसली आणि त्याच्या अंगावरून कार गेल्याने हा अपघात घडल्याची तक्रार इनॉषच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेनंतर सांगवी पोलीस स्टेशनमध्ये बेदरकारपणे कार चालविणाऱ्या सोनल देशपांडे या महिले विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात इनॉषच्या वडिलांची नोकरी गेल्याने त्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. अशावेळी पोटच्या मुलावर ओढवलेल्या या संकटाने कसब कुटुंब खचले असून इनॉषच्या उपचारासाठी लागणारा खर्च कसा उभा करायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. कंटेनरने अक्षरश: कारला चिरडलं जुलै महिन्यात मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला होता. खोपोली एक्झिट आणि फूड मॉल दरम्यान हा अपघात घडला. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला होता. एका कंटेनरवर असलेल्या मिरर कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर एक भरधाव कंटेनरवर चालकाने नियंत्रण सुटले होते. त्यामुळे हा कंटेनर एका कारवर आदळला. काही कळायच्या आत भरधाव कंटेनर कारला ढकलत नेत समोरील ट्रकवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, यात कार पूर्णपणे कंटेनरच्या चाकाखाली दबली होती. त्यामुळे कारमधील पती-पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर कारची बॉडी कटरच्या सहाय्याने कट करून तिघांना बाहेर काढले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Accident, Cctv footage, Pimpri chinchawad, Pune

पुढील बातम्या