मराठी बातम्या /बातम्या /पुणे /SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा दौरा पुणे मनसेला नवसंजीवनी देणार का?

SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा दौरा पुणे मनसेला नवसंजीवनी देणार का?

कारण कधीकाळी पुणेकरांनी याच मनसेला तब्बल 29 नगरसेवक निवडून दिले होते.

कारण कधीकाळी पुणेकरांनी याच मनसेला तब्बल 29 नगरसेवक निवडून दिले होते.

कारण कधीकाळी पुणेकरांनी याच मनसेला तब्बल 29 नगरसेवक निवडून दिले होते.

पुणे, 17 जुलै : मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) हे आता नाशिक (nashik) पाठोपाठ पुणे दौऱ्यावरही येणा आहेत. येता सोमवार ते बुधवार असा त्यांचा 3 दिवसीय भरगच्च पुणे दौरा असणार आहे. या दौऱ्यात "राज संवाद" या कार्यक्रमांतर्गंत ते पुण्यात विभागवार 4  पदाधिकारी मेळावे घेणार आहेत.  आगामी पुणे मनपा निवडणुकीच्या (pune municipal corporation election) तयारीसाठी नव्याने पक्षबांधणीसाठी राज ठाकरे हा पुणे (pune) दौरा करत असल्याचं मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितलं.

पुण्यात गेल्याच आठवड्यात मनसेच्या नूतन पक्ष कार्यालयाचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आठवड्याभराच्या अंतरानेच राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याने मनसैनिकांमध्ये उत्साह संचारलाय, "आता पुणे मनपात आमचे फक्त 2 नगरसेवक असले तरी आगामी  मनपा निवडणुकीनंतरच्या सत्ता समीकरणात आम्ही नक्कीच किंग मेकरच्या भूमिकेत असू, असा दावा मनसेचे नवे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी केला. तसंच, 'अनेक आजी-माजी नगरसेवक मनसेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचंही वसंत मोरे म्हणाले.

असं असलं तरी मनसे पुण्यात गतवैभव प्राप्त करणार का?  हाच खरा प्रश्न आहे. कारण राज्यात सधा मविआच्या माध्यमातून राष्ट्रवादीची सत्ता असल्याने अजित पवारांनीही देखील पुणे मनपात पक्षाची पुन्हा सत्ता आणण्यासाठी आत्तापासूनच जोरदार तयारी चालवली आहे. कालच अजितदादांनी आपलाच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश उरकून घेतले. तसंच माजी महापौर प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेताच नवे टोलेजंग राष्ट्रवादी भवन बांधून अजित पवारांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करून जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं.

तसंच 23 गावं पुणे मनपा हद्दीत समाविष्ट करून भाजपला मोठा चेकमेट देण्याचा प्रयत्न केला. कारण, या 23 गावांपैकी अनेक गावांमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे. राष्ट्रवादीची ही अशी घोडदौड बघून भाजपनेही मग 10 रूपयात वातानुकुलित बससेवा सुरू करून पुणेकरांना खुश करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात पुणे मनपाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आतापासूनच कामाला लागले आहे.

तरुणीला 5 डोळे आणि 5 ओठ; VIDEO पाहून डोकं चक्रावेल, काय आहे यामागील सत्य?

पण वार्ड रचना नेमकी कशी होतेय यावरच बरीच गणितं अवलंबून असणार आहेत. किंबहुना त्यासाठीच 23 गावं घाईघाईने पुणे मनपात समाविष्ट करण्याचा घाट राष्ट्रवादीने घातल्याचं बोललं जातंय. अशा सगळ्या राजकीय चढाओढीत आता मनसेनं देखील उडी घेतल्याच बघायला मिळतंय. म्हणूनच राज ठाकरेंचा तीन दिवसीय पुणे दौरा मनसेला पुन्हा नवसंजीवनी प्राप्त करून देणार का?  हेच बघायचं आहे. कारण कधीकाळी पुणेकरांनी याच मनसेला तब्बल 29 नगरसेवक निवडून दिले होते.

First published:
top videos