• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • SPECIAL REPORT : उजनीला प्रदुषणाचा विळखा, पाण्याला येतोय वास!

SPECIAL REPORT : उजनीला प्रदुषणाचा विळखा, पाण्याला येतोय वास!

उजनीतील पाण्याच्या प्रदुषणाची पातळी एवढी वाढली आहे की, पाणी वास मारते. शेतजमिनीवर तेलाचे तवंग दिसतात तर पाण्यात मलमुत्रापासून तयार झालेल्या गॅसच्या बुडबुड्या दिसतात.

  • Share this:
मधुकर गलांडे, प्रतिनिधी इंदापूर, 31 मार्च :  पुणे (Pune) सोलापूर (Solapur) आणि अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनीला (ujani  Dam) सध्या प्रदूषणाने ग्रासले आहे. कधीकाळी काचे सारखे चमकणाऱ्या पाण्याचा रंग पार बदलून गेला आहे. पिण्यासाठी तर सोडाच पण हे पाणी आता काही दिवसांत शेतीसाठी सुद्धा उपयोगी राहणार नाही, असे मत काही जलप्रदुषणावर अभ्यास करणाऱ्या जलतज्ञांनी व्यक्त केले आहे. पुणे जिल्ह्यातील भिमेच्या उगमापासून अनेक नद्या एकत्र येवून भीमा सारखी महाकाय नदीचे रुप उदयाला आले. यातील काही नद्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून येतात. आणि ही दोन्ही शहर देशात उद्योग आणि शहरीकरणात झपाट्याने वाढलेली शहरे म्हणून ओळख आहे. या शहरांचे नागरीकरण जेवढ्या झपाट्याने झाले तेवढ्याचे झपाट्याने उद्योगही वाढले. ही सर्व क्रांती होत असताना नद्याचे नाले कधी झाले हे प्रशासनाच्या लक्षात आलेच नाही. किंबहुना त्याकडे लक्षच दिले नाही. सुरक्षेसाठी चौकीत येणाऱ्यांवर गंगाजल-चंदनाचा लेप, पोलिसांचा अजब उपाय उद्योगाचे आणि नागरिकरणातील अशुद्ध पाणी सरळसरळ नदी पात्रात येताना दिसते. शहरातील मलमूत्र पाण्यात मिसळले जात आहे. आता तर या मलमुत्राचा टनेजचा आकडा वाढला असून दररोज सुमारे दीडशे ते दोनशे मेट्रीक टन मलमुत्र नद्यांच्या माध्यमातून  उजनीच्या पाण्यात येत आहेत. वास्तविक पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरापुरते आता नागरीकरण मर्यादित राहीले नाही. तर ते आता पुण्याच्या चाळीस किलोमिटर परिसरात पसरले आहे.  रोजच्या रोज नागरिकरणात होत असलेली वाढ आणि त्यापासून होणारे प्रदूषण चिंता करणारे आहे. आयुष्यात 'तणावमुक्त' राहण्यासाठी करा या 6 सोप्या गोष्टी उजनी धरण हे राज्यातील सर्वाधिक पाण्याचा साठा असणारे धरण आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे नंदनवन उजनी धरणामुळे झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.  शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावले आहे. तर हेच उजनी धरण शेतकऱ्यांच्या अर्थिक प्रगतीचा कणा बनले आहे. म्हणून उजनीला शेतकऱ्यांसाठी वरदायनी म्हटले जाते. पक्षी प्रेमींसाठी नंदनवन उजनी धरण उजनी धरण परिसराची प्राकृतिक व भौगोलिक परिस्थिती पक्षी जिवनास अतिशय अनुकूल असल्यामुळे या ठिकाणी पक्षीवैविध्याची परंपरा लाभली आहे. प्रत्येक वर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी शेकडो प्रकारचे पक्षी स्थलांतर करून उजनी पाणलोट क्षेत्रात येऊन धडकतात. युरोप, उत्तर अमेरिकासह अंटाटिका प्रदेश, रशिया, मंगोलिया, कझाकिस्तान, सायबेरिया येथून हजारो मैल अंतर पार करून बदकांसह विविध करकोचे, रोहित फ्लेमिंगो, नदीसुरम्य, समुद्रपक्षी, तुतुवार, पाणटिळवा, भोरड्या, बगळे आदी परदेशी पक्षी उजनी धरण परिसरात गर्दी करतात. पट्टकंदब हंस, कदंब हंस, परी बदक, चक्रवाक, बाड्डा बदक व विविध हंस पक्षी, स्थलांतरित करून आलेले हिवाळी पाहुणे पक्षी उष्णतेच्या 40 अंशांच्या पाण्याचा अनुभव घेऊन पावसाळ्याच्या प्रारंभी आपल्या मुळस्थानी मार्गस्थ होतात. टीव्हीवरील संस्कारी सून हिना खानने बिकिनीमध्ये लावला 'Hotness' चा तडका... युुरोप व अमेरिका खंडात होणाऱ्या हिमवृष्टीमुळे या पक्ष्यांना भूक भागविणे कष्टप्राय होते. हिमालयाच्या पलीक डील मंगोलिया, रशिया, सायबेरिया, अफगाणिस्तान व मध्य आशियातील अनेक राष्ट्रांमध्ये हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे पक्ष्यांच्या शरीरक्रियेत कमालीचा बदल होतो आणि याच काळात भारतात विशेषकरून महाराष्ट्रात या पक्ष्यांना अनुकूल वातावरण तयार होते. उजनी धरणातील पाणी उन्हाळ्यात कमी होत असल्याने कीटक, मासे, मृदुकाय प्राणी,बेडकाची पिल्ले आदी खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध होत असल्याने काही पक्षी तर आपल्या वंशवाढीसाठी सुद्धा परदेशातून इकडे वाऱ्या करतात़. विपुल पाणी,मुबलक खाद्य, लपण्यासाठी व विश्रांतीसाठी सुरक्षित जागा उजनी परिसरात आहे. विविध जाती, अनेक प्रकारचे पक्षी एकाच ठिकाणी पाहण्याचे एकमेव ठिकाण उजनी धरण असल्याने पक्षी प्रेमी, पक्षी अभ्यासकांनी उजनी धरण नंदनवनच आहे. Suaz Canal मध्ये अडकलेल्या जहाजातील भारतीय क्रू मेंबर्स बळीचा बकरा ठरणार? उजनीतील पाण्याच्या प्रदुषणाची पातळी एवढी वाढली आहे की, पाणी वास मारते. मच्छिमाराच्या हाता पायाला जखमा होऊ लागल्या आहेत.  शेतजमिनीवर तेलाचे तवंग दिसतात तर पाण्यात मलमुत्रापासून तयार झालेल्या गॅसच्या बुडबुड्या दिसतात.  उजनीच्या प्रदुषणावर वेळीच उपाय नाही केला तर वरदान ठरलेली उजनी शाप ठरू नये.
Published by:sachin Salve
First published: