SPECIAL REPORT : पुण्यात 5 दिवसात 7 आगीच्या दुर्घटना; जबाबदार कोण? 

SPECIAL REPORT : पुण्यात 5 दिवसात 7 आगीच्या दुर्घटना; जबाबदार कोण? 

शार्ट सर्किट हे जरी आगीचं एक प्रमुख कारण सांगितलं जात असलं तरी पुण्यातील छत्रपती मार्केट आणि फॅशन स्ट्रिटवरील (Fashion Street Fire)अग्निकांडांमागचं खरं कारण....

  • Share this:

 पुणे, 01 एप्रिल : पुण्यात (Pune) नऱ्हे परिसरातील अभिनव कॉलेज (abhinava college pune) नजीकच्या चार कंपन्यांना आग लागल्याची वर्दी मिळाली आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या काळजात पुन्हा धस झालं. कारण, गेल्या 5 दिवसातली शहरातली ही 7 वी घटना होती. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आटोक्यात आली खरी पण तोपर्यंत या कंपाऊंडमधील 4 छोट्या कंपन्या या अग्निकांडात जळून खाक झाल्या होत्या. बरं इतर आगींच्या घटनांप्रमाणे या आगीचं कारण ही अजून समजू शकलेलं नाही.

न्यूज 18 लोकमतने पुणे शहरातील आगींच्या वाढत्या घटनांबद्दल पुणे मनपा अग्निशमन दलाचे (Pune Municipal Fire Brigade) प्रमुख प्रशांत रणपिसे यांना विचारले असता ते म्हणाले, "प्रथमदर्शनी या आगी एकतर शॉर्ट-सर्किटमुळे लागल्या असाव्यात पण अजून ठोस कारणं पुढे आलेली नाहीत तरीही नागरिकांनी उन्हाळ्याचे दिवस असल्याने काळजी घ्यावी, विशेषत: वायरिंग चेक करून घ्यावे, शक्यतो एका प्लगवर लोड येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, कारण यातून ओव्हर हिटिंग होऊन शार्ट सर्किट होतं आणि आगीच्या दुर्घटना होतात."

आश्चर्यकारक! माणूसच नव्हे प्राण्यांनासुद्धा पडतं 'टक्कल'; पाहा PHOTO

दरम्यान, शार्ट सर्किट हे जरी आगीचं एक प्रमुख कारण सांगितलं जात असलं तरी पुण्यातील छत्रपती मार्केट आणि फॅशन स्ट्रिटवरील (Fashion Street Fire)अग्निकांडांमागचं खरं कारण अजूनही समोर आलेलं नाही. पण तिथले स्थानिक व्यापारी मात्र, या दोन्ही आगींमागे घातपात असल्याचा आरोप करत आहेत. या दोन्ही जागा मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळेच या आगी लावल्या तर गेल्या नाहीत ना?  अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

कँटोमेंटचे माजी आमदार रमेश बागवे यांनी तर फॅशनस्ट्रिट आगीबाबत स्पष्टपणे तसा आरोपही केला आहे. कारण, तिथल्या दुकानदारांना इतरत्र हलवण्याच्या नोटीसाही मिळाल्या होत्या. पण व्यापारी मार्केट सोडायला नकार देत होते. त्या वादातूनच हा प्रकार घडला तर नाहीना, अशी शंकाही बागवे यांनी उपस्थित केली.

IPL 2021 : सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज, हे खेळाडू चेन्नईत दाखल

तपासात नेमकं कारण पुढे येईलच. पण त्यात किमान 2 कोटींचं नुकसान झालंय त्याचं काय?  सर्वस्व गमावलेल्या या दुकानदारांना नुकसान भरपाई मिळणार हे का याबाबत कोणीच बोलत नाही, पालकमंत्री अजित पवारही फक्त पाहणी करून गेले. ही झाली फॅशनस्ट्रिट अग्निकांडाची शोकांतिका...पण इतर आगीचं काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. कारण, यापैकी बहुतांश आगीमागे शॉर्टसर्किट हेच कारण सांगितलं जातंय. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात पुणेकरांनी किमान यापुढे अशा आगी लागू नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

5 दिवसातील आगीच्या ठळक घटना

- शुक्रवारी रात्री फॅशनस्ट्रिट आगीत 2 कोटींचे नुकसान

- खराडीतही पाच दुकानं आगीत जळून खाक

- शनिवार  : गंजपेठेत मध्यरात्री भंगाराच्या गोदामाला आग, एक जण भाजून गंभीर जखमी

- सोमवार : कुमठेकर रस्त्यावरील शिक्षण खात्याच्या इमारतीला आग, येरवडा भागात एका शाळेच्या रेकॉर्ड रूमला आग

- मंगळवार : सेंट्ल मॉलच्या बेसमेंटला पावडर जळाल्याने वायू गळतीची दुर्घटना

- बुधवार  : नऱ्हे भागातील 4 कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी

Published by: sachin Salve
First published: April 1, 2021, 7:55 AM IST
Tags: pune fire

ताज्या बातम्या