S M L

उदयनराजे नावाचं वलय..!!

मुंबईत बाळासाहेब ठाकरे...८० च्या दशकात बोरगावात तयार झालेले बापू बिरू वाटेगावकर आणि अलीकडे उदयनराजे...उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज म्हणून सुरूवातीपासूनच थोडे वलयांकित इतकाच काय तो फरक...त्यामुळे त्यांना आपसूकच थोडं झुकत माप मिळालंय.

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2017 08:48 PM IST

उदयनराजे नावाचं वलय..!!

वैभव सोनवणे, पुणे

व्यक्तीप्रेमाचा भारतीय मानसिकतेचा उमाळा हा तसा जुनाच आहे. अनेक जण याच प्रेमाने सुपरहिरो ठरले..व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी होण्याची उदयराजेंच्या निमित्ताने काही पहिली वेळ नाही. याला काही अंशी आपली लोकशाही व्यवस्थाही जबाबदार आहे. इथल्या व्यवस्थेत पीडितांना न्याय मिळणं एकतर दुरापास्त किंवा मिळाला तरी तो इतक्या दिरंगाईने मिळतो की तोवर पीडिताची संघर्षाची शुद्धच हरपलेली असते. साहजिक जगण्याच्या संघर्षात अश्या समस्यांच वेगळ व्यवस्थाबाह्य समाधान शोधण्याचा प्रयत्न केला जातो, त्यातूनच मोठे होतात उदयनराजेंसारखे नेते.

"मैं खडा तो सरकार से बडा" हे उदयनराजेंच्या समर्थकांचं अत्यंत प्रिय वाक्य....उदयनराजे हे काही पहिलेच असे नेते नाहीत ज्यांना समर्थकांचा इतका मुबलक पाठिंबा मिळतो की त्यांच्यामुळे कायदाच पांगळा होऊन जातो, कारण स्पष्ट आहे आपली लोकशाही संख्याबळाच्या अधीन आहे. बाळासाहेब ठाकरेंवर आलेल्या रामगोपाल वर्माच्या सिनेमातला सुरूवातीचाच सीन आठवा.. "सरकार मुझे न्याय दो" म्हणत अमिताभ बच्चन यांच्यासमोर गडगडत असणारा व्यवस्था सोडून एका व्यक्तीकडे न्याय मागत असतो त्याला तो मिळतोही अत्यंत वेगाने, बेकायदेशीर पद्धतीने...पण वेदनेत अडचणीत आकंठ बुडालेला कायदा आणि बेकायदा अश्या तांत्रिक अडचणीत अडकत नाही त्याला न्याय हवा असतो. इथूनच सुरू होतो तो इमेजमेकिंग आणि समर्थक उभे राहाण्याचा प्रकार...आणि तयार होतात रॉबिनहूड इमेजचे नेते...मुंबईत बाळासाहेब ठाकरे...८० च्या दशकात बोरगावात तयार झालेले बापू बिरू वाटेगावकर आणि अलीकडे उदयनराजे...उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज म्हणून सुरूवातीपासूनच थोडे वलयांकित इतकाच काय तो फरक...त्यामुळे त्यांना आपसूकच थोडं झुकत माप मिळालंय.

या सगळ्यांची एकमेकांशी तुलना अशक्य आहे पण एका गोष्टीत भयंकर साम्य...यांनी न्यायव्यवस्थेला दिलेला विकल्प आणि तत्काळ न्याय मिळवून देण्याची केलेली व्यवस्था यामुळे मिळालेल्या समर्थकांनी या तिघांनाही कायद्यापेक्षा मोठं केलं..नाही म्हणायला त्यांनी लोकांच्याच हिताची केलेली कामं आणि त्यातून मिळालेलं वलय,लोकप्रियता स्वताला ढाल म्हणून वापरली,मग कधीतरी सत्तेत असलेल्या कुणीतरी स्वताच्या सोयीसाठीच्या राजकारणासाठी कायदा किती ताकदवान ,लोकशाही किती समर्थ हे दाखवण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लाऊन यांना अटक करून दाखवली आणि स्वत: मोठ व्हायचा प्रयत्न केला ,पण झालं उलटच...हे रॉबिनहूड त्या त्या काळात आणखी मोठे होत गेले.

आता हे लोकशाहीत ,कायद्याच्या भाषेत योग्य की अयोग्य हे सांगणं कठीण आहे कारण ज्यांच्यासाठी ही लोकशाही व्यवस्था आहे त्या लोकांनीच यांना डोक्यावर घेतलंय. मात्र हे होऊच द्यायच नसेल तर व्यवस्थेत पीडितांबद्दल ममत्व कणव निर्माण होण गरजेच आहे. तत्काळ न्याय मिळायची व्यवस्था उभारायला हवी नाही तर अशी छोटी छोटी प्रतिसरकार उभी राहतच जातील जी एखादवेळी लोकशाही सरकारलाच आव्हान देतील...आणि म्हणतीलही "मैं खडा तो सरकार से बडा"

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 08:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close