वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे : मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये क्लब किंवा पब कल्चर रुढ होत आहे. मात्र इथेही काही नियम पाळावे लागत असल्याने तरुणाईचा हिरमोड होतो. रात्री उशिरा पब आणि क्लब सुरू ठेवले मात्र डिजे लावण्यास बंदी असल्याने आता मालकांनी नामी शक्कल लढवली आहे. कायदा सुव्यवस्था कडक करण्यासाठी पुणे पोलिसांनी काही महत्वाची पावलं उचललीत ज्यात हॅाटेल्स पब ही 10 नंतर सुरू राहणार नाहीत असे आदेश करण्यात आले. अगदी पब्ज मध्ये जिथे आवाजाच्या धुमाकुळात तरूणाई बेभान होऊन नाचते तिथे ही रात्री10 नंतर स्पीकर्स बंद करण्याचे आदेश दिलेत. या सगळ्यावर व्यवसाय असलेल्या व्यावसायिकांनी त्यावर नवीन शक्कल लढवली आहे. सरकारी नियमांना पळवाट शोधून व्यवसाय करण्याची या पब व्यावसायिकांची नवी शक्कल तुम्हाला ही अचंबित करेल.
10 नंतर स्पीकर्सवर बंदी, व्यावसायिकांनी लढवली शक्कल; पोलिसांनी डोक्याला लावला हात#pune #police pic.twitter.com/Fi5ARZh2Hj
— News18Lokmat (@News18lokmat) July 12, 2023
या पब्ज मध्ये आता स्पीकर्स च्या ऐवजी थेट हेडफोन्स घालून डान्स सुरू केला आहे. आवाज नको असा नियम असल्याने हेडफोन्स लावून पबमध्ये तरुणाई डान्स करताना दिसत आहे. पोलिसांच्या नियमांवर व्यवसायिकांनी पळवाट शोधून काढली आणि हा मार्ग निवडला, त्यामुळे पोलिसांनी ही आता डोक्याला हात लावला आहे.

)







