एस.पी. कॉलेजमध्ये व्हॅलेन्टाईन, चॉकलेट डेच्या सेलिब्रेशनवर बंदी, हे आहे कारण?

एस.पी. कॉलेजमध्ये व्हॅलेन्टाईन, चॉकलेट डेच्या सेलिब्रेशनवर बंदी, हे आहे कारण?

एस. पी. कॉलेज सळसळत्या तरुणाईसाठी प्रसिद्ध आहे. असं असलं तरी यापुढे प्रेमवीरांना फेब्रुवारी महिन्यातील व्हॅलेन्टाईन डे साजरा करता येणार नाही.

  • Share this:

पुणे, 17 जानेवारी: पुण्यातील  सर परशुराम भाऊ अर्थात  एस. पी. या प्रसिद्ध कॉलेजात यापुढे रोज डे, व्हॅलेन्टाईन डे, चॉकलेट डे साजरे करता येणार नाहीत. कॉलेज व्यवस्थापनानं तसं पत्रक काढून ही माहिती दिलीय. कॉलेजमध्ये विविध डे साजरे करण्यात येत असल्यामुळं शैक्षणिक वातावरण बिघडतं आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं असे सर्वच डेज साजरे न करण्याचा निर्णय कॉलेज प्रशासनाचं घेतला आहे. कॉलेज प्रशासनाच्या या धोरणामुळं विद्यार्थ्यांमध्ये मात्र नाराजी आहे. जानेवारी -फेब्रुवारी सुरू झाला की पुण्यातील महाविद्यालयात गुलाबी थंडीसोबतच विविध दिन साजरे करण्याचेही वारे वाहू लागतात.

प्रसिद्ध असलेल्या एस. पी. कॉलेजमध्येही जानेवारी महिन्यात ट्रॅडिशनल डे किंवा साडी-टाय डे साजरा करण्यात येतो. तर फेब्रुवारी मध्ये व्हॅलेन्टाईन डे साजरा होत असतो.अशा सर्व दिवसांची सर्व विद्यार्थी अतुरतेनं वाट पाहात असतात. मात्र विविध डे कॉलेजमध्ये साजरे होत असल्यानं शैक्षणिक वातावरण बिघडतं शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्यानं सर्व डे साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखा पुढे ढकलून वरूण धवन अडकणार लग्नबंधनात

दुसरीकडे अशा डेजमुळं विद्यार्थ्यांना मज्जा येते. त्यामुळं असे डेज बंद करू नये असं विद्यार्थ्यांना वाटतं. उपद्रवी घटकांना आळा जरूर घालावा पण असे डेज सुरुच ठेवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

एस. पी. कॉलेज सळसळत्या तरुणाईसाठी प्रसिद्ध आहे. असं असलं तरी यापुढे प्रेमवीरांना फेब्रुवारी महिन्यातील व्हॅलेन्टाईन डे साजरा करता येणार नाही. त्यामुळं तरुणांना आपल्या गुलाबी भावनांना आवर घालावा लागणार आहे. तसेच यंदा व्हॅलेन्टाईन डे कॉलेजबाहेर साजरा करावा लागणार आहे. त्यामुळं कॉलेजबाहेर साजरा होणारा व्हॅलेन्टाईन डे कसा असेल याची चर्चा विद्यार्थी करत आहेत.

साराच्या समोर कार्तिकनं सांगितला त्याचा Valentine प्लान, अशी असेल 'डेट नाइट'

पुणे ही शैक्षणिक तसंच सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळं देशभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी पुण्यात येतात. शिक्षणाबरोबर विद्यार्थी इतर अनेक कार्यक्रम करत असतात. मात्र पुण्यातील एस. पी. कॉलेज प्रशासनानं तरुणाईच्या उत्साहाला पत्रक काढून आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कॉलेज प्रशासनाचं पत्रक विद्यार्थी गंभीरपणे घेऊन व्हॅलेन्टाईन डे कॉलेजमध्ये साजरा करणार नाही का? हेच आता पाहावं लागणार आहे.

हेही वाचा,

मृत्यूस डीएस कुलकर्णी जबाबदार.. म्हणत पुण्यात 'शिवसैनिक' ठेवीदाराची आत्महत्या

सुप्रिया सुळे यांचा संभाजी भिडेंच्या 'सांगली बंद'वर थेट आरोप, म्हणाल्या..

First published: January 17, 2020, 6:01 PM IST

ताज्या बातम्या