मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

कोरोनानं मुलगा हिरावला, विरह सहन न झाल्यानं मातृदिनीच आईनंही सोडले प्राण

कोरोनानं मुलगा हिरावला, विरह सहन न झाल्यानं मातृदिनीच आईनंही सोडले प्राण

पुण्यातील शिरूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका मुलाचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाल्यानं विरह सहन न झालेल्या मातेनं मातृदिनीचं (Mothers day) आपला प्राण सोडला आहे.

  • Published by:  News18 Desk

मांडवगण फराटा, 10 मे: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण (Corona cases) झपाट्यानं वाढत आहेत. कोरोना विषाणूची दुसरी लाट  (corona virus 2nd wave) अत्यंत घातक ठरत असून या लाटेच्या कचाट्यात सापडणाऱ्या अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत अनेकांचा मृत्यू (Corona deaths) होत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात आतापर्यंत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. तर अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमावलं आहे. पुण्यातील शिरूर येथून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं विरह सहन न झालेल्या मातेनं मातृदिनीचं (Mother's day) आपला प्राण सोडला आहे.

संबंधित घटना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील आहे. येथील पोपट ज्ञानदेव जगताप यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर दुसऱ्याचं दिवशी आई वच्छलाबाई ज्ञानदेव जगताप यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत पोपट जगताप हे घरातील कर्ते पुरुष होते. घरातील सर्व कौटुंबीक जबाबदाऱ्या त्यांच्यावरच होत्या. त्यांच्या अशा अचानक निधनाने जगताप कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी पोपट यांना कोरोनाची लक्षणं जाणवायला लागली आणि प्रचंड शारीरिक थकवाही जाणवायला लागला. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, दरम्यानच्या दोन दिवसांत त्यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाली.

हे ही वाचा-पोटनिवडणुकीच्या ड्यूटीनंतर शिक्षकासोबत कोरोनाही आला घरी,4 दिवसात कुटुंब उद्धवस्त

कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर लगेचंच मायलेकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचार सुरू असतानाचं अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या मुलाचा अंत्यसंस्कार होऊन डोळ्याच्या अश्रुही सुखले नाहीत, तो पर्यंत मातेनंही प्राण सोडला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या मातेनं मातृदिनीच आपला प्राण त्यागला आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Corona patient, Death, Pune