मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'कुणालाही वाटतं मी इतिहास तज्ज्ञ' राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

'कुणालाही वाटतं मी इतिहास तज्ज्ञ' राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

 जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांना विनाकरण आतमध्ये खेचणे हे योग्य नाही. हल्ली कुणालाही वाटतं मी इतिहास तज्ज्ञ आहे.

जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांना विनाकरण आतमध्ये खेचणे हे योग्य नाही. हल्ली कुणालाही वाटतं मी इतिहास तज्ज्ञ आहे.

जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांना विनाकरण आतमध्ये खेचणे हे योग्य नाही. हल्ली कुणालाही वाटतं मी इतिहास तज्ज्ञ आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पिंपरी चिंचवड, 08 जानेवारी : 'जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांना विनाकरण आतमध्ये खेचणे हे योग्य नाही. हल्ली कुणालाही वाटतं मी इतिहास तज्ज्ञ आहे. कुणी काही ही संदर्भ द्यायला लागले. मागचा पुढचा विचार नाही करायचा. काहीही बोलायचं, असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला.

'व्यंग ,वास्तव आणि राजकारण' या विषयावर 18 वे जागतिक मराठी साहित्य संमेलनात शोध मराठी मनाच्या या परिसंवादात राज ठाकरे यांची प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली.

'आज राजकारणच नाही. जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांना विनाकरण आतमध्ये खेचणे हे योग्य नाही. हल्ली कुणालाही वाटतं मी इतिहास तज्ज्ञ आहे. कुणी काही ही संदर्भ द्यायला लागले. मागचा पुढचा विचार नाही करायचा. काहीही बोलायचं. का तर माध्यम हे दाखवत आहे. हे 24 तास दाखवणे माध्यमांनी बंद करावे, यांची थोबाडं बंद होतील, असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे असे अनेक प्रश्न आहे. पण हे सगळं सोडून राणे काय बोलला, राऊत काय बोलला. हे दाखवणं सुरू आहे. कुणाला काय पडलं? असा सवालही राज ठाकरेंनी केला.

('शिवरायांचा अपमान करणारेच ‘औरंगजेबजी’ चा सन्मान करू शकतात, राऊतांचा बावनकुळेंवर निशाणा)

मी हल्ली राजकारणावर बोलणं सोडून दिलं आहे. मी महिन्याभरापूर्वी काही तरी बोललो. शरद पवार सुद्धा मध्येच येतात आणि काही तरी बोलतात. त्याचे कारणच हे आहे. मनोहर जोशी हे मंत्रालयामधील शाखेत होते आणि ते मुख्यमंत्री झाले. पण, तो काळ वेगळा होता. त्याचवेळी टीव्ही माध्यमं आली. आयुष्याला जो वेग आला, त्यावेळी एम टीव्ही सुरू झालं. 95 चा काळ होता, त्यावेळी सोशल मीडिया पुढे सरकारला, मोबाईल फोन सुद्धा आले. तुमच्या आयुष्यात त्याआधी शांतता होता. 95 नंतर शहरांची वाताहत झाली आहे. बेसुमार वाढ झाली आहे. त्यावेळी बाळासाहेबांशी माझा वाद झाला होता. त्यांची इच्छा प्रामाणिक होती. झोपडपट्टीवासियांना मोफत घरं, त्यावेळी झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा हा मराठी माणसांचा मोठा वर्ग होता. त्या मराठी माणसाला घरं मिळावं असा हेतू होता. मुंबईत मोफत घर मिळणार म्हटल्यावर देशभरातून लोकं बदाबदा येत गेली. सगळी वाताहत झाली. पायाभूत सुविधांवर खर्च करतो. येणाऱ्यांसाठी आज मेट्रो झाली, पूल झाले. ही येणाऱ्या लोढांसाठी व्यवस्था आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

(मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर, संजय राऊतांचा शब्द खरा ठरला!)

यामध्ये ज्याच्या हाती सत्ता, त्याच्या हाती काठी आहे. ज्यांच्या हातात सत्ता होती. ब्लू प्रिंट म्हणजे विकास आराखडा आणला होता. झोपडपट्टी पूनर्वसन योजना ही सरकारने ताब्यात घ्यावी, या प्रकरणाचे प्लॉट, घरं असेल त्याबद्दल सरकारने योजना राबवावी. महाराष्ट्र हा सर्वाथाने श्रीमंत आहे. आहे ते टिकवलं तरी महाराष्ट्र खूप पुढे आहे. एक दोन प्रकल्प बाहेर गेले तर महाराष्ट्राचं काही नुकसान होणार नाही, असंही राज ठाकरे म्हणासे.

First published:

Tags: Ajit pawar, अजित पवार, राज ठाकरे