मैत्रिणीची ओळख करून द्यायला नकार दिल्यामुळे तरुणाला मारहाण

मैत्रिणीची ओळख करून द्यायला नकार दिल्यामुळे तरुणाला मारहाण

या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आलीय. प्रणव दातार,अमोघ रानडे,गुरुबिरसिंग लांबा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

  • Share this:

पुणे, 09 जुलै : हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यावर मैत्रिणीची ओळख करून द्यायला नकार दिल्यामुळे तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडलीय. या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आलीय. प्रणव दातार,अमोघ रानडे,गुरुबिरसिंग लांबा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पार्थ व्यास आणि शंतनू राय हे त्यांच्या दोन मैत्रिणींसोबत मुंढवा परिसरातील लोकल गॅस्ट्रो बारमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्या यावेळी आरोपीही जेवण्यासाठी आले होते. त्यावेळी दातार याने पार्थजवळ तुझ्या मैत्रिणीशी ओळख करून द्यायला सांगितलं. मात्र पार्थने  तसं करायला नकार दिल्याने हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. आजूबाजूच्या लोकांनी हे दृश्य मोबाईलमध्ये कैद केलं.

First published: July 9, 2017, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading