पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात नसलेल्या IT कंपन्या आजपासून सुरू होणार, संघटनांचा मात्र विरोध

पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात नसलेल्या IT कंपन्या आजपासून सुरू होणार, संघटनांचा मात्र विरोध

प्रतिबंधित परिसरातील कोणत्याही IT कर्मचाऱ्यांना कामावर जाता येणार नाही नसल्याची बाब जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

  • Share this:

 पिंपरी चिंचवड 06 मे: पिंपरी चिंचवड जवळील हिंजवडी परिसरात असलेल्या राजीव गांधी पार्क मधील काही IT कंपन्या आजपासून सुरू होणार आहेत. काही अटी आणि शर्थिंवर राज्य सरकारने कंपन्या सुरू करण्याची परवानगी दिल्याचा दावा करत या कंपन्यांनी तशी माहितीही आपल्या कर्मचाऱ्यांना मेलकरून दिली आहे. त्याचबरोबर  कंपनीच्या इमारतीमध्ये अशा प्रकारची तयारीही केली आहे.

राज्य सरकारने दिलेल्या परवानगी नुसार 33 टक्के कर्मचारी बुधवारपासून कामावर रुजू होऊ शकणार आहेत.  मात्र असं असलं तरीही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात घोषित केलेल्या प्रतिबंधित परिसरातील कोणत्याही IT कर्मचाऱ्यांना कामावर जाता येणार नाही नसल्याची बाब जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

दुसरीकडे IT कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी मात्र राज्य सरकारच्या ह्या निर्णयाला विरोध असल्याचं FITEचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सांगितलं आहे.

दरम्यान,  वाईन शॉप्सला परवानगी दिल्यानंतर सर्व देशभर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यात नियम कडक करण्यात आले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लिकरशॉप सुरू केलेत पण नियमांच पालन होत नसल्याचं दिसून येत आहे. नियमांचं पालन झालं नाही तर  आम्ही थेट विक्रीचे परवाने रद्द करायची कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला.

दारूला परवानगी देणाऱ्या सरकारने मॉर्निंग वॉकला मुभा द्यावी, पुण्यातून नवी मागणी

ते पुढे म्हणाले, वाईनशॉपला जाताना गाडी वापरली तर कारवाई केली जाईल. त्यामुळे दारू घ्यायला आता पायीच जाव लागणार आहे. रस्त्यावर येणारी वाहन कुठली हे पोलीस आणि जिल्हा प्रशासन म्हणजे आम्हीच ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुणेकरांना मोठा दिलासा! सामान्यांनाही हे नियम पाळून मिळणार इंधन

पुणे विभागातून वेगवेगळ्या राज्यात स्थलांतरित होण्यासाठी मजूर विद्यार्थी कामगार यांच्याकडून मोठी मागणी आहे. 1200 जण जायला तयार असतील तर रेल्वे गाडी सोडायला सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही गाडीमध्ये कुठेही थांबणार नाही असंही ते म्हणाले.

First published: May 6, 2020, 7:43 AM IST

ताज्या बातम्या