Home /News /pune /

तुम्हाला आठवते का पेप्सीची चव! रोहित पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

तुम्हाला आठवते का पेप्सीची चव! रोहित पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

सोशल मीडियाचा अत्यंत उत्तम वापर त्यांनी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. रोजच्या भेटी-गाठी सामाजिक कार्य, अशा अनेक गोष्टींची माहिती रोहित पवार सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात. त्यामुळं त्याची चर्चा होते.

    बारामती, 13 जून: सोशल मीडिया (Social Media) ही आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी बाब झाली आहे. सेलिब्रिटी, नेते, क्रीडापटू यांच्यासाठी तर चर्चेत राहण्यासाठीही त्याचा मोठा फायदा होतो. राजकारण्यांचा विचार करता शक्यतो याचा वापर राजकीय वक्तव्य किंवा टीका, पाठिंबा फार तर जयंती, वाढदिवसाच्या शुभेच्छा यासाठी होतो. पण रोहित पवारांना (Rohit Pawar) जनसंपर्काबरोबरच सोशल मीडियाची ताकदही कळलीय. त्यामुळं या दोन्ही गोष्टींचा ते एकत्रित वापर करताना दिसतात. (वाचा-"मोर्चा काढून काय होणार? पंतप्रधानांनी भूमिका घेतली तर प्रश्न मार्गी लागेल") कोणत्याही राजकारण्यासाठी जनसंपर्क ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आपला संबंध असलेल्या आणि अनेकदा संबंध नसला तरी सामान्य लोकांशी संपर्क असणं त्यांच्यासाठी नेहमी फायद्याचं असतं. रोहित पवारांनाही हे गमक कळलेलं दिसतंय. कारण सोशल मीडियाचा अत्यंत उत्तम वापर त्यांनी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. रोजच्या भेटी-गाठी सामाजिक कार्य, अशा अनेक गोष्टींची माहिती रोहित पवार सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात. त्यामुळं त्याची चर्चा होते. (वाचा-‘सुशांत प्रकरणाचा तपास का थांबला?’ उशा नाडकर्णी यांचा पोलिसांना सवाल) रोहित पवारांच्या अशाच एका पोस्टची चर्चा होत आहे. सोशल मीडियाच्या एका ताज्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपण लहानपणी सगळ्यांनीच पेप्सी खाल्लेली आठवत असेल. त्याबाबतची आठवण त्यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमधून मांडली. तसंच ज्या दुकानातून ते पेप्सी घ्यायचे त्या दुकानाला भेट देऊन त्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, ''शाळेत असताना मित्रांसोबत उन्हाळ्यात अनेकदा पेप्सी खायचो. सध्या जून महिना असला तरी उन्हाचा चटका चांगलाच जाणवतोय. त्यामुळं हळगावमध्ये सुरेश शेठ कांकरीया यांच्या सचिन ट्रेडर्स या दुकानाला सदिच्छा भेट दिली तेंव्हा पुन्हा एकदा पेप्सीची टेस्ट घेतली, तेंव्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या.'' आजच्या बदललेल्या काळात जनसंपर्काची साधनं बदललेली आहेत. त्यांचा उत्तम वापर रोहित पवार करताना दिसत आहेत. अशा भेटिगाठींच्या माध्यमातून एक तर ते प्रत्यक्ष लोकांशी संपर्क वाढवत आहेत. पण सोशल मीडियावर त्याची चर्चा करून ते इतरांपर्यंत आणि तरुणांपर्यंतही याची माहिती पोहोचवत आहेत. त्यामुळं भविष्यात याचा फायदा त्यांना नक्कीच होऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rohit pawar, Social media, Social media trends

    पुढील बातम्या