...तर जून अखेरपर्यंत सिरम संस्था करणार 10 कोटी लस निर्मिती!

...तर जून अखेरपर्यंत सिरम संस्था करणार 10 कोटी लस निर्मिती!

पूनावाला यांना दिलेल्या धमक्यांच्या वातावरणानंतर राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे : जगभरातली सगळ्यात मोठी लस बनवणारी कंपनी म्हणून ओळख असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांना धमक्या मिळत असल्याचा गंभीर खुलासा केलेला होता. मात्र त्यानंतरही सिरम इन्स्टिट्यूटची घौडदौड अत्यंत वेगाने सुरू असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज मितीला इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल एक कोटी लशींचा साठा करण्यात आला आहे. प्रति महिना पाच ते सहा कोटी लशींचं उत्पादन करायला सिरम इन्स्टिट्यूटला यश मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट मांजरी स्थित नव्याने सुरू झालेल्या प्लांटमध्ये लशीच्या उत्पादनाची तयारी सुरू असून नियोजनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या तर जून महिन्याच्या अखेरीस सिरम इन्स्टिट्यूटकडून प्रतिमहिना दहा कोटी लसींची निर्मिती केली जाऊ शकते.

या सगळ्या प्रकरणानंतर केंद्र सरकारकडून 11 कोटी लशींच्या नव्या खेपीच्या मागणीची नोंद झाल्याचा खुलासा आदर पूनावाला यांनी केला आहे. त्यासाठीची पैशांची रक्कम आणि केंद्र सरकारकडून अदा करण्यात आली असल्याची माहिती पूनावाला यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची वाढलेली क्षमता जर जूनपर्यंत दहा कोटी लशी तयार करू शकले तर देशासाठी ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची यशस्वी घडामोड असेल. त्यामुळे नियोजित असलेल्या नव्या प्लांटच्या विस्तारात सीरम इन्स्टिट्यूटला यश येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावरच देशात केला जाणारा लशींचा पुरवठा वाढवता येणार आहे.

हे ही वाचा-मरणही परवडेना! स्मशानात जाण्यासाठी उकळले बक्कळ पैसे; रुग्णवाहिका चालकाला अटक

त्यामुळे आदर पुनावाला यांची सुरक्षा त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. पूनावाला यांना दिलेल्या धमक्यांच्या वातावरणानंतर राज्यातल्या राजकारण ढवळून निघाले सत्ताधारी आणि विरोधक हवेत एकमेकांवर आरोप करत आहेत.

मात्र, या सगळ्यापेक्षा तातडीने लशीचा थांबलेला पुरवठा कसा सुरळीत होईल हे पाहणं जास्त महत्त्वाचा आहे. कारण, पुण्यासारख्या शहरात गेले दोन दिवस लसीकरण हे पूर्णतः ठप्प आहे. केवळ 18 वर्षांवरच्या सातशे मुलांनाच लसीकरण करता येऊ शकले आणि त्याचे कारण आहे लशींचा पुरवठा...त्यामुळे तातडीने लशीची उपलब्धता करण्याबाबत सगळ्याच राजकीय पक्षांनी पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट समन्वयाने लस उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 3, 2021, 7:05 PM IST

ताज्या बातम्या