Home /News /pune /

'...तर पुण्यासाठी मी निर्णय घेतला म्हणून सांगा', अजित पवारांचा आपल्याच मंत्र्यांना सल्ला

'...तर पुण्यासाठी मी निर्णय घेतला म्हणून सांगा', अजित पवारांचा आपल्याच मंत्र्यांना सल्ला

 आता कुणी पुण्याचं काही विचारलं तर सांगा पालकमंत्री निर्णय घेतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मीच निर्णय घेणार आहे

आता कुणी पुण्याचं काही विचारलं तर सांगा पालकमंत्री निर्णय घेतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मीच निर्णय घेणार आहे

'आता कुणी पुण्याचं काही विचारलं तर सांगा पालकमंत्री निर्णय घेतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मीच निर्णय घेणार आहे'

पुणे, 08 ऑगस्ट : राज्यात निर्बंध शिथिल करण्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) पुन्हा एकदा मंत्र्यांची नाराजी दिसून येत आहे. पुण्यात (pune) निर्बंध कायम ठेवल्यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी बैठक घेऊन निर्णय शिथिल (pune unlock) करण्याची घोषणा केली आहे. आता जर कुणी विचारलं तर पालकमंत्री म्हणून मी निर्णय घेतला असं सांगा' असं म्हणत अजितदादांनी अप्रत्यक्षपणे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना सल्ला दिला. पुण्यात निर्बंध अखेर शिथिल करण्यात आले आहे. पण, मुंबईसाठी वेगळे नियम आणि पुण्यासाठी वेगळे नियम ठेवण्यावरून वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यात वाद निर्माण झाला होता. अखेर पुण्यातला वाद सोडवण्यासाठी अजितदादांनी बैठक घेऊन थेट निर्णय घेतला. पुण्यात दुकानं आता रात्री ८ वाजेपर्यत खुली राहणार आहे. तर हॉटेल १० पर्यंत सुरू राहणार आहे. हा निर्णय घेत असताना अजित पवारांनी आपली रोखठोक भूमिका सुद्धा मांडली. प्रेमासाठी कायपण! हाताला दोरी बांधून अल्पवयीन प्रेमीयुगुलानी नदीत घेतली उडी अन्. 'आम्हाला निर्णय घेण्यात अजिबात हौस नाही. ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहे. त्यामुळे निर्णय घ्यावे लागतात. पण आता कुणी पुण्याचं काही विचारलं तर सांगा पालकमंत्री निर्णय घेतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मीच निर्णय घेणार आहे, प्रस्ताव पाठवण्याची काही गरज नाही, असं अजित पवारांनी सांगितलं. तसंच, व्यापाऱ्यांनी हे असं करायला नको होतं. त्यांना माहिती आहे, हे हौसेने आम्ही करत नाही.  सरकारचा महसूल बुडतो. पण लोकांचे जीव महत्वाचे आहेत, ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. पुण्यात कोरोनाची लाट आली होती तेव्हा दोनच लॅब आपल्याकडे होत्या. ऑक्सिजन सुद्धा बाहेरून मागावे लागले होते, असंही अजित पवार म्हणाले.

Job Alert: मीरा भाईंदर महानगरपालिकेत 'या' पदांसाठी भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

गणेशोत्सवाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. राज्यात मंदिर उघडण्याबाबत जो निर्णय आहे, तो पुण्यासाठी सुद्धा लागू आहे. पण लक्षात घ्या जिथे लोक जमत आहेत तिथे रुग्ण वाढत आहेत. सोलापूराला वारी मार्गावरच्या तालुक्यांमध्ये रुग्ण वाढले आहेत, असंही अजित पवार यांनी सांगितलं. पुण्यात असे आहे नियम - सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार - हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार - शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी - मॉल रात्री ८ पर्यंत सुरू ठेवता येणार, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश - राज्याप्रमाणे पुण्यात सुद्धा मंदिरं बंद राहणार - गणेशोत्सवाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार - दुकानातील कर्मचाऱ्यांना लशीचे दोन डोस बंधनकारक - मास्क वापरणे सक्तीचे तसंच, शनिवारी आणि रविवारी दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. , मास्क वापरणे, दुकानं आणि मॉलमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक असणार आहे. जर पॉझिटिव्ह रेट जर 7 टक्क्यांच्या पुढे गेला तर पुन्हा एकदा निर्बंध लावले जातील, असा इशाराही अजित पवारांनी दिला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ajit pawar, Pune, Pune news

पुढील बातम्या