उसाच्या फडात चावला साप, जादूटोणा करून काढत होते विष, पण...

उसाच्या फडात चावला साप, जादूटोणा करून काढत होते विष, पण...

या प्रकरणी मांत्रिक जयवंत शिंदे यांच्या विरुद्ध पोलीस पाटील विनायक दंडवते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

  • Share this:

पुणे, 30 डिसेंबर : पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात सध्या ऊसतोडीचे जोरदार काम सुरू आहे. ऊस तोड करत असताना एका मजुराला विषारी साप चावल्यानंतर त्याच्यावर अघोरी उपचार करणाऱ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरी मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली असून त्या मजुरावर वेळीच उपचार मिळाल्याने ऊसतोड मजुराचे प्राण वाचले असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी दिली आहे. याबाबत मंत्र-तंत्राद्वारे विंचू उतरविणाऱ्या मांत्रिकाविरुद्ध रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेगाव खालसा येथे ऊस तोडणी मजुराला विषारी साप चावल्याने त्याला औषधोपचारासाठी दवाखान्यात न नेता मांत्रिकाद्वारे अघोरी उपचार करण्याबाबत येत असल्याबाबत माहिती मिळाली.  त्यानुसार तात्काळ रांजणगावचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस पथक तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते यांच्यासमवेत घटनास्थळी धाव घेतली.

Baby bump सह फॅशन मॅगझिनवर झळकली अनुष्का; Bold फोटोशूटच्या स्वतःच पडली प्रेमात

यावेळी माहिती घेतली असता ऊसतोड मजुर अंकुश बंडु वाघ(रा.देवघट,ता.मालेगाव,जि.नाशिक) यास  उसाच्या फडात विषारी सापाने दंश केला होता व त्याच्यावर कथित मांत्रिक जयवंत श्रीपती शिंदे(रा.गणेगाव खालसा) हा मंत्र-तंत्राद्वारे अघोरी उपचार करताना दिसून आला. यावेळी सदर पोलिसांच्या पथकाने उसतोड मजुराची मांत्रिकाची ताब्यातून सुटका करुन तत्काळ दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले. वेळेत औषधोपचार मिळाल्याने उसतोडणी कामगाराचे प्राण वाचले आहेत.

या प्रकरणी मांत्रिक जयवंत शिंदे यांच्या विरुद्ध पोलीस पाटील विनायक दंडवते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून मांत्रिकास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी दिली आहे.

corona ला दूर ठेवण्यासाठी दररोज 5 लिटर पाणी पिणं व्यक्तीच्या जीवावर बेतलं

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सु्रेशकुमार राउत,पोलिस नाईक एम.बी.काळकुटे,व्ही.पी.मोरे,व्ही.एन,मोहिते,आर.बी.होळनोर,महिला पोलीस अंमलदार शुभांगी पवार,निर्मला ओव्हाळ  यांच्या पथकाने केली.

Published by: sachin Salve
First published: December 30, 2020, 5:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या