गोविंद वाकडे, प्रतिनिधी पुणे, 11 ऑक्टोबर : पिंपरी चिंचवड शहरातील हटके फ्लेक्सबाजी काय थांबता थांबत नाही आहे. याआधी 'SHIVDE I AM SORRY' अशा पोस्टरने खळबळ माजवली होती आणि आता असंच एक पोस्टर अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये लावण्यात आलं आहे. "स्मार्ट बायका कुठे जातात " हे वाक्य लिहलेली फ्लेक्स बायकांसाठी डोकेदुखी ठरतेय. पिंपरी शहरातील आकुर्डि ते चिखली या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. ऐन नवरात्रीत स्त्रियांवर अशी वाक्य लिहून नेमकी जाहिरातबाजी कोण करतय, महापालिकेने त्यांना परवाणगी कशी दिली असा प्रश्न आता उपस्थित होतो.