Home /News /pune /

मासे सापडतील म्हणून पाण्याची टाकी केली खाली, सापडली कवटी आणि हाडं, पुण्यातील घटना

मासे सापडतील म्हणून पाण्याची टाकी केली खाली, सापडली कवटी आणि हाडं, पुण्यातील घटना

'पाण्याच्या टाकीत तळाशी असलेल्या एका प्लॉस्टिकची पिशवीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी ती पिशवी उघडून बघितली'

पिंपरी चिंचवड, 17 नोव्हेंबर : सार्वजनिक शौचालयाच्या टाक्यात मानवी हाडांचा सांगाडा सापडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. पिंपरीतील टेल्को रोडवरील बालाजी नगर झोपडपट्टी परिसरात ही घटना घडली असून सध्या MIDC भोसरी पोलीस या घटनेचा तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगरमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे झोपडपट्टी धारकांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी काही स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत पाणी साचल्याच पाहून त्यात मासे असतील, या हेतूने टाक्यातील सर्व पाणी खाली केलं. तेव्हा तळाशी असलेल्या एका प्लॉस्टिकची पिशवीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी ती पिशवी उघडून बघितली तेव्हा त्यांना त्यामध्ये पूर्ण वाढ झालेली मानवी कवटी आणि इतर सर्व अवयवांच्या हाडांचा सांगाडा आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पंकजा मुंडेंच्या बीडमध्ये भाजपला हादरा,माजी मंत्र्याचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा स्थानिकांनी याबद्दल तात्काळ पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि मानवी कवटी आणि इतर अवयव असलेली पिशवी ताब्यात घेतली. हा सांगाडा नेमका या टाक्यात कुणी आणून टाकला तो पुरुषाचा आहे की, महिलेचा आहे? ज्या व्यक्तीचा सांगाडा असेल त्याची हत्या करण्यात आली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून या घटनेचा छडा लावण्याच आव्हान पोलिसांसमोर  उभ ठाकले  आहे. CBSCच्या 10वी-12वीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार नाही-सुप्रीम कोर्ट मानवी सांगाडा काही दिवसांपूर्वीच पाण्याच्या टाकीत टाकला असावा, असा अंदाज भोसरी पोलिसांनी व्यक्त केला आहे.  सांगाड्या बाबतचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच आपण  लवकरच तपास पूर्ण करू असा विश्वास MIDC भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस यशवंत गवारी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अशा पद्धतीने सांगाडा सापडण्याची ही शहरातील पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणत भीतीच वातवरण बघायला मिळले. या घटनेमुळे बालाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या