BREAKING:पिंपरी चिंचवडमध्ये धोका कायम, आणखी 6 जणांना कोरोनाची लागण

BREAKING:पिंपरी चिंचवडमध्ये धोका कायम, आणखी 6 जणांना कोरोनाची लागण

कोरोनाची लागण झालेले चारही जण निजामुद्दीन येथे मरकज येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती आहेत.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 4 एप्रिल: पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना व्हायरसचा धोका कायम आहे. शनिवारी आणखी 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची लागण झालेले चारही जण निजामुद्दीन येथे मरकज येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. सध्या पिंपरीत एकूण कोरोना बाधितांची संख्या 9 असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

हेही वाचा..उत्तरेकडून दक्षिणेकडे निघालेल्या 8 मुस्लीम यात्रेकरुंना लातुरमध्ये कोरोनाची लागण

मिळालेली माहिती अशी की, तबलिगी जमाततील महाराष्ट्रात परत आलेल्यांमधील 11 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. दोन पुणे, सहा पिंपरी-चिंचवड, दोन अहमदनगर तर एक हिंगोलीत सापडला आहे. आतापर्यंत 738 जणांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एकूण 1033 लोकांशी संपर्क करण्यात आलेला आहे.

सोशल डिस्टसिंगला हरताळ

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहन केलं आहे.  मात्र,  पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्त,  महापौर आणि सत्तारूढ काही नेत्यांककडून सोशल डिस्टसिंगचं पालन होत नसल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा.. 'शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासह कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करा'

पिंपरी-चिंचवडमध्ये आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्यासह महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सोशल डिस्टसिंग हरताळ फासल्याचं समोर आलं. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोरोना व्हायरस वॉर रूमची पाहणी करण्यात आली. यावेळी याचं काटेकोरपणे पालन होत नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. नेते आणि आधिकारी हा नियम मोडत असतील तर सामान्याचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

First published: April 4, 2020, 11:22 PM IST

ताज्या बातम्या