पुण्याची श्रृती श्रीखंडे संयुक्त रक्षा सेवा परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम

या अंतिम परीक्षेसाठी २३२ जण पात्र झाले होते. या परीक्षेत निपुर्ण दत्ता मुलांमध्ये प्रथम तर पुण्याची श्रुती श्रीखंडे मुलींमध्ये प्रथम आली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 2, 2018 11:21 AM IST

पुण्याची श्रृती श्रीखंडे संयुक्त रक्षा सेवा परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम

02 फेब्रुवारी : पुण्याची श्रृती श्रीखंडे सीडीएस म्हणजेच संयुक्त रक्षा सेवा परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम आलीये. श्रृती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी आहे. श्रृती कायद्याची विद्यार्थिनी आहे.

संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षेचा अंतिम निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला. या अंतिम परीक्षेसाठी २३२ जण पात्र झाले होते. या परीक्षेत निपुर्ण दत्ता मुलांमध्ये प्रथम तर पुण्याची श्रुती श्रीखंडे मुलींमध्ये प्रथम आली आहे.

श्रुती श्रीखंडेने आयएलएस पुणे इथून कायद्याचे शिक्षण घेतले आहे तर तिने शालेय शिक्षण पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलमधून झाले आहे. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे श्रुतीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. एप्रिल २०१८ पासून तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2018 11:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...