Home /News /pune /

संजय राऊतांच्या 'स्टेपनी'च्या वक्तव्यावर अजित पवारांचे बंधू नाराज, म्हणाले...

संजय राऊतांच्या 'स्टेपनी'च्या वक्तव्यावर अजित पवारांचे बंधू नाराज, म्हणाले...

स्टेपनी ही गाडीसाठी महत्त्वाची असल्याचे संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले होते

पुणे,16 जानेवारी: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा ‘स्टेपनी’ असा उल्लेख केला होता. स्टेपनी ही गाडीसाठी महत्त्वाची असल्याचे ते आपल्या भाषणात म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रतिहल्ला केला आहे. श्रीनिवास पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्यांनी ‘विनाष काले विपरीत बुद्धी (संजय राऊत)’ असं लिहिलं आहे. त्यांची ही पोस्ट समाज माध्यमांवर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. संजय राऊत यांनी अजित पवार यांचा ‘स्टेपनी’ हा केलेला उल्लेख श्रीनिवास पवार यांना खटकल्याने त्यांनी सूचक पोस्ट केल्याची चर्चा आहे. काल दैनिक लोकमत पत्रकारिता पुरस्काराचे संजय राऊत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. उदयनराजे हे साताऱ्याचे माजी खासदार ते भाजपचे नेते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वंशज आहेत. शरद पवारांना आम्ही जाणते राजे मानतो तर उदयनराजे ना राजे मानतो. शरद पवार हे जाणते राजे जनतेने उपाधी दिली हिंदू हृदयसम्राट ही उपाधी बाळासाहेबांना जनतेने दिली आहे. रयतेचा राजा लूटमार करणारे राजे होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी उदयनराजे यांना टोला लगावला.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: #Pune, Facebook post, Pune news

पुढील बातम्या