मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यातली दुकानेही आता रात्री 9 पर्यंत खुली राहणार, ग्राहकांना दिलासा

पुण्यातली दुकानेही आता रात्री 9 पर्यंत खुली राहणार, ग्राहकांना दिलासा

पुणे शहरात मायक्रो कंटेन्मेंट झोनचीही  पुनर्रचना करण्यात आलीय. आता अवघे 33 मायक्रो कंटेन्मेंट झोन्स असणार आहेत.

पुणे शहरात मायक्रो कंटेन्मेंट झोनचीही पुनर्रचना करण्यात आलीय. आता अवघे 33 मायक्रो कंटेन्मेंट झोन्स असणार आहेत.

हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना व्यवसायासाठी रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी आहे पण दुकानदारांना मात्र अजूनही संध्याकाळी 7 वाजताच शटर डाऊन करावं लागत होतं त्यामुळे त्यांनीही वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.

पुणे 09 ऑक्टोबर: पुण्यात दुकानदारांना रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून तब्बल 30 हजार दुकानदारांना त्याचा फायदा होणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना व्यवसायासाठी रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी आहे पण दुकानदारांना मात्र अजूनही संध्याकाळी 7 वाजताच शटर डाऊन करावं लागत होतं त्यामुळे त्यांनीही वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. व्यापाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने अखेर महापालिका प्रशासनाने हा नवा निर्णय जाहीर केला आहे.

पुण्यात एकूण 30 हजार दुकानं आहेत. काम संपवून लोक रात्री बाहेर निघतात आणि त्याच वेळेला दुकाने बंद करावी लागतात अशी अशी व्यापाऱ्यांची तक्रार होती. त्यामुळे आता दुकानेही रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुधारीत वेळेचे आदेश जारी केले आहेत.

अनलॉकच्या प्रक्रियेनुसार आता सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे हॉटेल्स आणि बार सुरू करण्याला परवानगी दिली होती.

दरम्यान,  गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वे सेवा आता पूर्वपदावर येत आहे. पुणेकर आणि मुंबईकरांची लाडाची असलेली डेक्कन क्वीन पुन्हा एकदा रुळावर धावणार आहे.  दोन दिवसांनी अर्थात 9 ऑक्टोबरपासून डेक्कन क्वीनसह पाच रेल्वे गाड्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मोठी बातमी! भीमा-कोरेगाव प्रकरणी NIAची मोठी कारवाई, आणखी एकाला अटक

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे  गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे सेवा ठप्प होती. पण आता कोरोनाचा जोर ओसरत असल्यामुळे रस्ते वाहतुकीनंतर रेल्वे वाहतूक ही सुरू करण्यात येत आहे.

9 ऑक्टोबरपासून पुणे- मुंबई मार्गावरही रेल्वे गाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. एकूण 5 गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे.  त्यामुळे  पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेस आणि  मुंबई गोंदिया या विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे.

पुण्यात चोरी न दरोडा तरीही दोन तरुणांनी बँकेला गंडवलं, वाचा नेमकं काय घडलं

या पाचही रेल्वे गाड्यांचे आरक्षण उद्या 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे 6 महिन्याच्या लॉकडाउननंतर प्रवाशांची लाडकी 'दख्खनची राणी' रुळावर येणार आहे.  मात्र, संपूर्ण रेल्वे या आरक्षित असणार आहे. यामध्ये सामान्य बोगी (जनरल कोच) नाहीत. एवढंच नाहीतर पासधारकांना सुद्धा या रेल्वेनं प्रवास करता येणार नाही. फक्त ज्यांच्याकडे आरक्षित तिकीट आहे, त्यांनाच या रेल्वेनं प्रवास करता येणार आहे.

First published:

Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)