पत्ता विचारला असता कारची काच खाली केली अन् हल्लेखोराने पिस्तुलमधून झाडल्या 4 गोळ्या, मावळमधली घटना

पत्ता विचारला असता कारची काच खाली केली अन् हल्लेखोराने पिस्तुलमधून झाडल्या 4 गोळ्या, मावळमधली घटना

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी व्यावसायिकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मावळमधील वाहनगावात घडली.

  • Share this:

आनिस शेख, प्रतिनिधी

मावळ, 22  जुलै :  पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी व्यावसायिकावर गोळीबार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना मावळमधील वाहनगावात घडली. या गोळीबारामध्ये चार गोळ्या लागल्याने व्यवसायिक गंभीर जखमी झाला आहे.

मिलिंद मणेरीकर असं जखमी झालेल्या 50 वर्षीय व्यावसायिकाचे नाव आहे. मणेरीकर हे आपल्या XUV कार मधून चेतन निमकर या मित्रासोबत कामानिमित्त वाहनगाव येथे असलेल्या संकल्प फार्म हाऊसवर जात होते.

विनामास्क फिरणाऱ्यांना पत्रकारानं असा शिकवला धडा, VIDEO पाहून आवरणार नाही हसू

वडेश्वर वाहनगावादरम्यान दुचाकी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांची कार थांबून 'हांडे पेट्रोल फॉर्म कुठे आहे' असा पत्ता विचारण्याचा बहाणा केला. दुचाकीस्वारांना माहिती देण्यासाठी मणेरीकर यांनी आपल्या कारची काच खाली घेतली असता, दुचाकीवर मागे बसलेल्या अज्ञात इसमाने त्याच्याजवळ असलेल्या गावठी पिस्तुलमधून मनेरीकर यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या आणि काही कळण्याआधीच घटनास्थळावरून दोघे पसार झाले.

राज्यसभेत उदयनराजेंची शपथ ठरली वेगळी, सभापतींनी दिला समज, पाहा हा VIDEO

हल्ल्यात मनेरीकर यांच्या मानेला एक गोळी घासून गेली असून त्यांच्या पोटात तीन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांची मदत घेत जखमी मणेरीकर यांना तात्काळ सोमाटणे येथील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

Published by: sachin Salve
First published: July 22, 2020, 1:35 PM IST

ताज्या बातम्या