मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

VIDEO : तीन दिवसांपासून पुण्यात बंद कारमध्ये होता मृतदेह; परिसरात खळबळ

VIDEO : तीन दिवसांपासून पुण्यात बंद कारमध्ये होता मृतदेह; परिसरात खळबळ

दिवसागणिक पुण्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी वृत्तांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

दिवसागणिक पुण्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी वृत्तांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

दिवसागणिक पुण्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी वृत्तांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

पुणे, 7 ऑक्टोबर : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. बंद कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह (Dead body in Locked Car) आढळल्याने पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-chinchwad) सध्या एकच खळबळ उडाली आहे. महेश लक्ष्मण पायगुडे असे मृत आढळलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महेश काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यांच्या घरच्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र महेश बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली नाही. हे ही वाचा-पुणे: नातवानं आजीच्या प्रेमाचं फेडलं पांग; क्षुल्लक कारणासाठी दिली भयंकर शिक्षा एका चारचाकी वाहनात काही वेळा पूर्वी महेश पायगुडेचा मृतदेह आढळून आला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महेशचा मृतदेह गाडीमध्ये असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महेश यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून, सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आला आहे. दिवसागणिक पुण्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी वृत्तांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीला आग लावल्याचा प्रकार समोर आला होता. पिंपरी चिंचवडमध्ये ( Pimpri Chinchwad ) एका कामगाराने पगार न दिल्यामुळे मालकाची दुचाकीच भर रस्त्यावर पेटवून दिली होती. (bike was burnt inPimpri Chinchwad) मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली आहे. अंकित शिशुपाल यादव असं दुचाकी पेटवून देणाऱ्या कामगाराचं नाव आहे. अंकित यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो मांजरी येथे गणेश उंदरे पाटील यांच्याकडे कामाला होता.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Crime news, Dead body, Pune

पुढील बातम्या