मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातील गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; महिला डॉक्टरचे नग्न VIDEO आणि फोटो केले Viral

पुण्यातील गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; महिला डॉक्टरचे नग्न VIDEO आणि फोटो केले Viral

या प्रकारानंतर महिलेला जबर मानसिक धक्का बसला आहे.

या प्रकारानंतर महिलेला जबर मानसिक धक्का बसला आहे.

या प्रकारानंतर महिलेला जबर मानसिक धक्का बसला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
पुणे, 9 ऑक्टोबर : पुण्यात (Pune Crime News) सातत्याने वाढणारे गुन्हेगारीचे वृत्त हा चिंतेचा विषय होत चालला आहे. पुण्यातील पिंपरी या भागातून असंच एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. आता तर एका महिला डॉक्टरसोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. या डॉक्टर महिलेला लग्नाचं अमिष दाखवून व्हिडीओ कॉलवर बोलण्यास भाग पाडलं. त्यावेळी डॉक्टरचा कपडे काढून नग्न (Naked Video and Photos) व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल करण्यात आला. पिंपरी-चिंचवड या भागात 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. (Shocking type of crime in Pune Offensive VIDEO and photo of female doctor made viral) मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात प्रणव अरविंद पांचाळ या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या तरुणाविरोधात 36 वर्षीय पीडित महिलेने 8 ऑक्टोबर रोजी वाकड पोलीस (Pune Wakad Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून व्यवसायाने डॉक्टर आहे. प्रणव पांचाळ याने महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं. दोघे व्हॉट्सअपवरील व्हिडीओ कॉलवर बोलत असताना पीडितेला तिचे कपडे काढण्यास सांगितलं. आरोपीने महिलेचा नग्न व्हिडीओ स्क्रिन रेकॉर्ड केला आणि हे नग्न फोटो पीडितेला मेलआयडीवरुन पाठवले. याशिवाय महिलेच्या मोबाइलवरही हा व्हिडीओ पाठवला. सहा महिन्यांपूर्वीच पीडितेचं लग्न झालं आहे. हा सर्व प्रकार 2 मार्च 2020 रोजी सुरू झाला. हे ही वाचा-पाळत ठेवण्यासाठी सुनेच्या बेडरूममध्ये लावला CCTV; सासू, सासरा आणि नणंदेचं भयंकर दरम्यान आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांना फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेला त्रास देणे, बदनामी करण्याची धमकी, विनयभंग अशा स्वरुपाची तक्रार फिर्यादीत करण्यात आली आहे.
First published:

Tags: Crime news, Pune

पुढील बातम्या