पुण्यातील 11 वर्षीय मुलाच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, मित्राने 'क्राईम पेट्रोल' पाहून केली हत्या!

पुण्यातील 11 वर्षीय मुलाच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, मित्राने 'क्राईम पेट्रोल' पाहून केली हत्या!

11 वर्षीय विश्वजीत वंजारी याच्या हत्येबाबत त्याच्या अल्पवयीन मित्राने कबुली दिली आहे.

  • Share this:

पुणे, 3 फेब्रुवारी : कोथरूडमध्ये अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी उलगडा करण्यात तपास पथकाला यश आलं आहे. क्राईम पेट्रोल मालिका पाहून मित्रानेच मित्राची हत्या केल्याचं उघड झालं आहे. 11 वर्षीय विश्वजीत वंजारी याच्या हत्येबाबत त्याच्या अल्पवयीन मित्राने कबुली दिली आहे.

पकडा-पकडी खेळत असताना दोन वेळा राज्य आल्यामुळे रागातून आरोपीने विश्वजीत वंजारी याच्या मित्राला डोक्यात मारले. त्यामुळे तो खाली पडल्यानंतर अल्पवयीन मित्राच्या डोक्यात सिमेंटचा दगड मारून खून केल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीने क्राईम पेट्रोल मालिका पाहून अतिशय थंड डोक्याने खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - सहलीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांनी 17 जणांना घेतलं ताब्यात

गेल्या शुक्रवारपासून 11 वर्षीय विश्वजीत वंजारी बेपत्ता होता. रविवारी केळेवाडी नजीकच्या झुडपात त्याचा मृतदेह सापडला आणि पोलिसांनी आपला तपास सुरू केला.

मागील दोन दिवसांपासून कोथरूड तपास पथकाने अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे. मात्र चिंता करण्यास भाग पाडणारं कारण या हत्या प्रकरणात समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आरोपी अल्पवयीन मुलगा कोथरूड पोलिसांच्या ताब्यात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 3, 2021, 1:45 AM IST

ताज्या बातम्या