धक्कादायक! औषध प्रिस्क्राइब करावं म्हणून डॉक्टरांना 'स्त्रियांची' लाच; पुण्यातल्या डॉक्टरांनी उघड केलं सत्य

धक्कादायक! औषध प्रिस्क्राइब करावं म्हणून डॉक्टरांना 'स्त्रियांची' लाच; पुण्यातल्या डॉक्टरांनी उघड केलं सत्य

डॉक्टरांनी आपल्या कंपनीचं औषध प्रिस्क्राइब करावं यासाठी वेगवेगळ्या सवलती, भेटवस्तू, डेबिट- क्रेडिट कार्ड, पेट्रो कार्ड, शॉपिंग व्हाउचर्स एवढंच नाही तर डॉक्टरांना कथित मनोरंजनासाठी स्त्रियाही पुरवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणात समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : डॉक्टरांनी (Doctor) आपल्या कंपनीचं औषध प्रिस्क्राइब करावं यासाठी औषध निर्माण कंपन्यांतर्फे (Pharma Company) वेगवेगळ्या सवलती, भेटवस्तू, डेबिट- क्रेडिट कार्ड, पेट्रो कार्ड, शॉपिंग व्हाउचर्स एवढंच नाही तर डॉक्टरांना कथित मनोरंजनासाठी स्त्रियाही पुरवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणात समोर आली आहे. पुण्यातल्या दोन डॉक्टर कार्यकर्त्यांनी हे भयंकर वास्तव उघड केलं आहे.

मेडिकल रिप्रेझेंटेटीव्हज आणि डॉक्टर यांच्याशी बोलून एकंदर सहा शहरांमध्ये केलेल्या एका अभ्यासात धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. औषधनिर्माण कंपन्या (फार्मा कंपन्या)आणि डॉक्टर यांच्यातले असे अवैध व्यवहार पुण्यातल्या दोन कार्यकर्त्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले. पुण्यात आरोग्यविषयक काम करणाऱ्या साथी या स्वयंसेवी संस्थेच्या डॉ. अरुण गद्रे आणि डॉ. अर्चना गिवटे यांनी सहा शहरांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह आणि डॉक्टर यांच्या मुलाखती घेऊन सर्व्हे केला. फार्मा कंपन्या आपली औषधं प्रमोट करण्यासाठी काय काय क्लृप्त्या लढवतात हे यातून उघड झालं. यासंबंधीचं वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. डॉ. गद्रे आणि डॉ. गिवटे यांनी आपल्या अभ्यासाअंती एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यामध्ये डॉक्टर - फार्मा कंपन्या यांच्या धक्कादायक संबंधांविषयी माहिती उघड झाली आहे.

हे वाचा - सरकारने ऑनलाइन औषधं विक्रीवर केली बंदी, काय आहे कारण?

या कंपन्या डॉक्टरांचेही दोन गट करतात. कोअर ग्रूपमधले डॉक्टर कंपन्यांना थेट फायदा करून देतात. सेकंडरी ग्रूपमधले डॉक्टर या प्रणालीत अप्रत्यक्षपणे सामील असतात, असं या वृत्तात म्हटलं आहे. स्पेशालिस्ट डॉक्टरांचा वेगळा गट असतो आणि नामांकित किंवा प्रभावी डॉक्टरांची वेगळी यादी कंपन्यांकडे असते. वेगवेगळ्या गटातल्या डॉक्टरांची 'खास' काळजी घेतली जाते, असं या अहवालात म्हटलं आहे.

हे वाचा - 15 डिसेंबरपासून बदलणार बँकेचा नियम, जाणून घ्या अन्यथा भरावं लागेल अतिरिक्त शुल्क

बहुतांश डॉक्टर औषध कंपन्यांच्या प्रलोभनांना बळी पडतात. छोट्या मोठ्या प्रमाणात त्यांनी दिलेल्या भेटवस्तू आणि फायदे स्वीकारतात, असं या अभ्यासात दिसून आलं आहे. फक्त 20 टक्के डॉक्टर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने घालून दिलेले नियम पाळतात आणि फार्मा कंपन्यांनी देऊ केलेली लाच किंवा प्रलोभनं नाकारतात, असं या अभ्यासात दिसून आलं. डॉ. वैद्य आणि डॉ. अर्चना यांनी या अभ्यासासाठी 75 डॉक्टरांच्या आणि 40 मेडिकल रिप्रेझेंटेटीव्हच्या मुलाखती घेतल्या होत्या.

हे वाचा - 2 हजार रुपयांच्या नोटा बंद होणार का? मोदी सरकारने दिलं हे उत्तर

या कंपन्यांकडून डॉक्टरांना विविध भेटवस्तू, शॉपिंग व्हाउचर्स, क्रेडिट कार्ड दिली जातातच, पण मनोरंजनासाठी स्त्रियाही पुरवल्या जातात, असं या अभ्यासात दिसून आलं.

------------------------------------------

अन्य बातम्या

गॅस दाहिनीतून धूर आणि दुर्गंधीमुळे पुणेकर हैराण, बळावला फुफ्फुसाचा विकार

लोकसभेनंतर पहिल्यांदाच शिंदे आणि उदयनराजे समोरासमोर, गळाभेटीत वैर गळून पडले!

नव विवाहितेला हातपाय बांधून जिवंत जाळले, एकाच घरातली खुनाची दुसरी घटना

SC/ST आरक्षणाला 10 वर्षे मुदतवाढ, केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

मोदी सरकारचा मोबाईल यूझर्सना मोठा दिलासा, घेतला 'हा' निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2019 05:05 PM IST

ताज्या बातम्या