Home /News /pune /

धक्कादायक! पुण्यातल्या पर्वतीवर भेटायला बोलावलं आणि तरुणीवर केला बलात्कार

धक्कादायक! पुण्यातल्या पर्वतीवर भेटायला बोलावलं आणि तरुणीवर केला बलात्कार

Pune Crime: पुण्यातील (Pune) पर्वती टेकडीवर (Parvati hill) तरुणीला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली असून आरोपीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

    पुणे, 23 डिसेंबर: पुण्यातील (pune news) पर्वती टेकडीवर (Parvati Hill) तरुणीला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर घडली आहे. ही घटना 24 नोव्हेंबरला घडली होती. मात्र तरुणीने  तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणीची आरोपीशी पूर्वीपासूनच ओळख होती. दोघे चांगले मित्र होते. पण पर्वतीवर भेटायला बोलावून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.  तक्रारदार तरुणी एका मॉलमध्ये काम करते. तर आरोपी तरुण एका कंपनीत काम करतो. मॉल आणि कंपनी शेजारी असल्यामुळं या दोघांची ओळख झाली होती. त्यातूनच त्यांच्या मैत्रीचं नात फुलत गेलं. त्यानंतर आरोपीनं 24 नोव्हेंबरला रात्री तरुणीला पर्वती टेकडीवर भेटायला बोलवलं. यावेळी पीडित तरुणी या आरोपीला भेटायला एकटी गेली. या संधीचा फायदा घेऊन आरोपी तिला पर्वती टेकडीच्या जंगलात घेऊन गेला. तिथे नेवून त्यानं तिच्यावर अत्याचार केला आहे. बलात्कार केल्यानंतर सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली. या घटनेनंतर पीडित तरुणी गुपचूप आपल्या घरी निघून गेली होती. मात्र यानंतरदेखील आरोपी तिला सतत त्रास देत होता. आरोपी योगेशच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली. तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पर्वती टेकडीच्या जंगलात ही घटना घडली. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणीने दत्तवाडी पोलीसांत तक्रार दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Rape

    पुढील बातम्या