• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • Pune : मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पुण्यातील घटनेने खळबळ

Pune : मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे हादरले ! 16 वर्षीय मुलावर मित्रानेच केला अनैसर्गिक अत्याचार (प्रातिनिधिक फोटो)

पुणे हादरले ! 16 वर्षीय मुलावर मित्रानेच केला अनैसर्गिक अत्याचार (प्रातिनिधिक फोटो)

Pune Crime news : पुण्यात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:
    पुणे, 21 नोव्हेंबर : पुणे शहरात (Pune city) आता अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलावर मित्रानेच शारीरिक अत्याचार (Sexual assault) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपला तपास केला आणि आरोपी तरुणाला अटक केली आहे. (Minor boy sexually assault by his friend in pune) मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दांडेकर पूल परिसरात ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाला स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तळजाई पठार येथे राहणारा 16 वर्षीय मुलगा आपल्या मित्राला भेटण्यासाठी दांडेकर पूल परिसरात गेला होता. यावेळी अल्पवयीन मुलाला त्याचा जुना मित्र 21 वर्षीय सागर सोनवणे भेटला. त्यानंतर सागर सोनवणे याने पीडित मुलाला बोलण्यात गुंतवत जवळच असलेल्या एका स्वच्छतागृहात नेलं. यानंतर तेथे त्याला मारहाण करुन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. महाराष्ट्र टाइम्सने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. वाचा : पूजा हत्याकांडाचा उलगडा; पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड या घटनेनंतर पीडित मुलगा आपल्या घरी गेला आणि कुटुंबीयांना त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलासह त्याच्या कुटुंबीयांनी थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, पोलिसांनी या प्रकरणाच्या तक्रारीनंतर तात्काळ शोधमोहिम हाती घेत आरोपीला अटक केली. या प्रकरणात दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे. Facebook LIVE करत पुण्यात वेटरची आत्महत्या पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरने फेसबूक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे. फेसबूक लाईव्ह (Facebook Live) करत इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेतल्याची घटना समोर आली. (Waiter commits suicide) रेस्टॉरंट इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेत वेटरने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृतक वेचरचं नाव अरविंद सिंह राठौर असे असून तो 26 वर्षांचा होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरविंद सिंह राठौर हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला लागला होता. घटनेपूर्वी अरविंद याने फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवल्याचा आरोप केला व त्यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाच सांगितले जात आहे.
    First published: