मराठी बातम्या /बातम्या /पुणे /देशात ड्रग्सबाबत चर्चा सुरू असताना पुण्यातून आली धक्कादायक बातमी; नायजेरियन कनेक्शनचा खुलासा

देशात ड्रग्सबाबत चर्चा सुरू असताना पुण्यातून आली धक्कादायक बातमी; नायजेरियन कनेक्शनचा खुलासा

सुशांत प्रकरणात ड्रग्ज हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चीला जात आहे, पुणे-नायजेरियन कनेक्शन समोर आले आहे

सुशांत प्रकरणात ड्रग्ज हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चीला जात आहे, पुणे-नायजेरियन कनेक्शन समोर आले आहे

सुशांत प्रकरणात ड्रग्ज हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चीला जात आहे, पुणे-नायजेरियन कनेक्शन समोर आले आहे

पुणे, 10 सप्टेंबर : सुशांत सिंह प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला नार्कोटिक्स नियंत्रण विभागाने अटक केली आहे. त्यानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्स पार्टी आदी गोष्टींबाबत मोठी चर्चा सुरू आहे. त्यात पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ व खंडणीविरोधी पथकाने मागील आठ महिन्यात एक कोटी 39 लाख 19  हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी 102 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वीच अमली पदार्थविरोधी पथकाने पुण्यातील कोंढवा परिसरातून 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे 55 ग्रॅम कोकेन जप्त केले होते.

हे ही वाचा-पुण्यातील रिक्षावाल्यांनी चक्क विजय माल्ल्याच्या प्रतिमेला वाहिली फुलं

अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या आठ महिन्यात केलेल्या कारवाईत सर्वाधिक 55 किलो गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत 9 लाख 64 हजार 340 रुपये इतकी आहे. त्या खालोखाल 424 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. त्याची किंमत 38 लाख 81 हजार 800 रुपये इतकी आहे. याशिवाय चरस, मेफेड्रोन यासारखे अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत.

हे ही वाचा-भयंकर! कोरोना रुग्णांमध्ये पुणे देशात अव्वल, 'या' चुकीमुळे वाढला प्रादुर्भाव?

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी निम्म्या किमतीचे अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातल्या अमली पदार्थांच्या विक्रीमध्ये नायजेरियामधून मेडिकल व्हिजा आणि बिजनेस व्हिजावर आलेल्या परदेशी तरुणांचा मोठा सहभाग असल्याचं आजपर्यंतच्या  कारवायामधून निष्पन्न झाल आहे.

किती अमली पदार्थ केले जप्त

61 गुन्ह्यामध्ये 68 लाख रुपये किमतीचा 222 किलो गांजा जप्त

दोन गुन्ह्यांमध्ये 36 लाख रुपये किमतीच्या 370 ग्रॅम कोकेन जप्त

पाच गुन्हया मध्ये दहा लाख रुपये किमतीचं 140 ग्रॅम मेफोड्रेन जप्त

First published: