मोठी बातमी, पुण्यात कोरोना परिस्थितीत महापालिकेतून धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी, पुण्यात कोरोना परिस्थितीत महापालिकेतून धक्कादायक माहिती समोर

जम्बो हॉस्पिटल करता पालिकेला 46 कोटी रुपये द्यायचे आहेत. डॉक्टर्स, नर्सेससह प्रशिक्षित स्टाफ यायला तयार नाही.

  • Share this:

पुणे, 15 सप्टेंबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पण ऐन कोरोना काळात पुणे विभागातील आरोग्य विभागाच्या 750 जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.  यात शल्य चिकित्सक,भूलतज्ञ अशा महत्वांच्या जागांचाही समावेश आहे.

पुणे पालिकेने टप्प्या टप्प्याने भर्ती सुरू असल्याचे सांगत  कोविड सेंटरवर जोर दिला. तर  पालिका स्वतःची रुग्णालये  सक्षम करणे, त्यातील रिक्त जागा भरणे याकडे दुर्लक्ष करत जम्बो घोळ घालत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे.

पुण्यात कोरोना रुग्ण बाधितांचा दर अर्थात पॉझिटिव्ह रेट 30 टक्के इतका पोहोचला आहे. राज्य सरकार आणि पालिका यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आलेले जम्बो रुग्णालय आता रुळावर येत असलं तरी तिथं प्रशासकीय गोंधळ सुरू आहे.

'तो' BMC कर्मचारी आणि 'तो' रेल्वे खात्यात कामाला,दोघांचेही समलैंगिक संबंध, पण...

यातच पालिकेच्या रुग्णालये सक्षम नसणे, आरोग्य विभागाच्या 750 जागा रिक्त असणे डॉक्टर्स, प्रशिक्षित स्टाफची कमतरता, यामुळे कोरोनाला अटकाव घालणे कठीण होत चालले आहे.

मात्र पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणता की, 'भरती सुरूच आहे'. तसंच पालिकेच्या 17 कोविड सेंटर्समधून 50 हजार पुणेकर बरे झाले, असा ही दावा त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करावे का?

विरोधकांना हे दावे मान्य नाहीत. 3 वर्षे आरोग्य विभागाची भरlr रखडली तरी सत्ताधारी गप्प का? जम्बो कोविड सेंटर मध्ये 800 ऐवजी 185 बेड्सचं उपलब्ध का? पालिकेची रुग्णालयांची खस्ता हाल का आणि असं असून ब्लेम गेम का असे सवाल  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष जगताप आणि आम आदमी पार्टीचे अभिजीत मोरे यांनी उपस्थित करत आहे.

जम्बो हॉस्पिटल करता पालिकेला 46 कोटी रुपये द्यायचे आहेत. डॉक्टर्स, नर्सेससह प्रशिक्षित स्टाफ यायला तयार नाही. पालिकेचे उत्पन्नाचे मार्ग खुंटले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

अशात कोरोना रुग्ण बाधित दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे राजकारण बाजूला ठेवत पालिकेने सर्व रिक्त जागा  लवकरात लवकर जागा भरल्या पाहिजेत आणि राज्य सरकारनंही याकरता आर्थिक निधीसह सर्व मदत केली पाहिजे.

Published by: sachin Salve
First published: September 15, 2020, 2:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या